भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी

India vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 23, 2025, 11:18 AM IST
भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी
Photo Credit: X

India vs Pakistan Champion Trophy 2025 Updates: दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बहुप्रतिक्षित सामन्यात भारताचा 23 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. आता सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने बांगलादेशवर ६ गडी राखून विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. दुसरीकडे, यजमान पाकिस्तानला या आठवड्याच्या सुरुवातीला कराची येथे झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली ज्यामुळे त्याने सराव सत्रातही भाग घेतला नाही. तर एकाला सर्व सत्रातच दुखापत झाली असल्याची शक्यता आहे. 

'हा' स्टार खेळाडू पडला आजारी 

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी, स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतला व्हायरल ताप आला आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत, भारतीय फलंदाज आणि संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने पुष्टी केली की पंत 22 फेब्रुवारी रोजी सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलला ऋषभ पंतपेक्षा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्राधान्य देण्यात आले होते. पंत या सामन्याच्या प्लेइंग-11 चा भाग नव्हता.

हे ही वाचा: आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! सामन्याचे प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर

 

चेंडू कोहलीच्या पायाला दुखापत

चेंडू विराट कोहलीच्या पायाला लागला. यानंतर तो आईस पॅक घेऊन उभा असल्याचे दिसले. मात्र, विराट कोहलीची दुखापत गंभीर नाही. तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

हे ही वाचा: कोण असणार रुपेरी पडद्यावरचा सौरभ गांगुली? बायोपिकसाठी 'या' बॉलीवूड हिरोचे नाव निश्चित

 

 

हे ही वाचा: शिखर धवनसोबतची 'ही' मिस्ट्री गर्ल कोण होती? नेटिझन्स शोधत असलेली प्रोफाइल सापडली

 

खराब फॉर्ममुळे सध्या हैराण झालेल्या विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी जोरदार सराव केला. तो शनिवारी सरावासाठी तीन तास लवकर आयसीसी क्रिकेट अकादमीत पोहोचला. त्याच्यासोबत यूएईचे सुमारे डझनभर अव्वल गोलंदाज होते. त्याला सराव करायला अभिषेक नायर आला. विराटची ही तयारी आजच्या सामन्यात नक्कीच फायदेशीर ठरू शकते. विराट कोहलीची बॅट नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळते.