नजर हटी दुर्घटना घटी! अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला

Champions Trophy 2025 : टीम इंडिया विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. तेव्हाच पाकिस्तानच्या दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट काढून टीम इंडियाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. 

पुजा पवार | Updated: Feb 23, 2025, 04:54 PM IST
नजर हटी दुर्घटना घटी! अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : क्रिकेटमधील महत्वाच्या सामन्यात निष्काळजीपणाचा शिक्षा किती मोठी असू शकते हे भारत - पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी भारत - पाक सामना खेळवला गेला. या सामन्यात अक्षर पटेलची खतरनाक फिल्डिंग पाहून सर्वच थक्क झाले. टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी निवडली. सुरुवातीच्या आठ ओव्हरमध्ये पाकिस्तानने एकही विकेट गमावली नव्हती. फलंदाज बाबर आझम आणि इमाम उल हक हे दोघे क्रीजवर सेट होते. टीम इंडिया विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. तेव्हाच पाकिस्तानच्या दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट काढून टीम इंडियाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. 

अक्षर पटेलच्या रॉकेट थ्रोमुळे इमाम माघारी : 

10 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानची केवळ एक विकेट निघाली होती. हार्दिक पंड्याने बाबर आझमला बाद करून पॅव्हेलियनमध्ये धाडले होते. तेव्हा रोहितने कुलदीप यादवकडे बॉल दिला. पहिला बॉल इमामने खेळला आणि दुसऱ्या बॉलवर सिंगल घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र याच निर्णय त्याला भारी पडला. इमाम पुन्हा एकदा क्रीजच्या बाहेर निघून बॉल मिड ऑनच्या दिशेने सिंगल खेळायचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी अक्षर पटेलने बॉल हातात घेतला आणि स्टंपच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. इमाम-उल-हक हा क्रीजपासून थोडा दूर होता त्यामुळे तो रन आउट झाला. दुसरी विकेट मिळाल्यामुळे भारतीय संघात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पाकिस्तानचा स्कोअर 47 धावांवर 2 विकेट असा होता. इमामने 26 बॉलमध्ये 10 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमां हा दुखापतीने ग्रस्त असल्याने तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून इमामला संधी मिळाली होती. 

पाहा व्हिडीओ :  

हार्दिक पंड्याने बाबरला केलं गुडबाय : 

नवव्या ओव्हरला पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज बाबर आझम बाद झाला. भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्याने त्याला बाद केले. 26 बॉलवर 23 धावा करून तो बाद झाला. यावेळी बाबरची विकेट घेतल्यावर हार्दिकने त्याला हात दाखवून गुडबाय असा इशारा केला. 

भारताची प्लेईंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

पाकिस्तानची प्लेईंग 11 :

इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद