आशिष उदास, मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीमध्ये आज अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. दुपारी 2.30 वाजता कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर मुकाबला सुरू होणार आहे. साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे. पण अफगाणिस्तानच्या ताफ्यात असे अनेक खेळाडू आहेत जे मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी टीमच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेऊन शकतात. त्यामुळे साऊथ आफ्रिका अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही..
साऊथ आफ्रिकेच्या ताफ्यात असे अनेक खेळाडू आहेत जे एकहाती संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलू शकतात. पण बॅटिंगमध्ये त्यांची मदार खास करुन कॅप्टन तेंबा बवुमा, एडन मार्करम, हेनरिक क्लासन आणि डेव्हिड मिलरवर असणार आहे. बॉलिंगमध्ये कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, केशव महाराज, मार्को ऍन्सन आणि तबरेज शमसीला छाप पाडावी लागणार आहे.
अफगाणिस्तानच्या ताफ्यात मोजकेच असे खेळाडू आहेत जे संघाच्या विजयात वाटा उचलू शकतात. हशमतुल्ला शाहिदी राशीद खान, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, रेहमनाउल्ला गुरबाज, अझमतउल्ला ओमरझाई आणि फझल फारूकीवर टीमच्या विजयाची प्रामुख्यानं जबाबदारी असेल.
Afghanistan take on South Africa in the first match of Group B in Karachi
How to watch the big clash https://t.co/S0poKnwS4p pic.twitter.com/qXB7i5Uh9g
— ICC (@ICC) February 21, 2025
साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान किती वेळा हेड टू हेड?
साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान आतापर्यंत 5 वेळा आमनेसामने आलेत, त्यात साऊथ आफ्रिकेनं 3 वेळा विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्ताननं 2 वेळा विजय संपादित केलाय.
ग्रुप बीमधील आजच्या मॅचकडे नजर टाकली तर दोन्ही टीम विजय मिळवण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरतील. साऊथ आफ्रिका नक्कीच अफगाणिस्तानसमोर बलाढ्य दिसत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे त्यामुळे अफगाण प्लेअरच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असेल.