माजी पोलीस अधिकाऱ्यावर का आली भीक मागण्याची वेळ?

Former Police Officer : नेमकं काय झालं की माजी पोलीस अधिकाऱ्यावर आली भीक मागण्याची वेळ, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2025, 07:41 PM IST
माजी पोलीस अधिकाऱ्यावर का आली भीक मागण्याची वेळ?

Former Police Officer : पोलीस अधिकारी म्हटल्यावर त्यांचा एक वेगळा रुबाब आपण पाहतो. त्यांना समाजात  असलेला एक वेगळा मानसन्मान पाहतो. पण तुम्हाला या सगळ्यात कधी ऐकायला मिळालं की एका माजी पोलीस अधिकाऱ्यावर भीक मागण्याची वेळ आली तर तुम्ही काय म्हणाल... महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. कारण असं कधी होईल किंवा झालं असेल असा विचारही तुमच्या डोक्यात येणार नाही. मात्र, असं खरंच झालं आहे. आज आपण त्याच माजी पोलीस अधिकाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्यावर चक्क भीक मागण्याची वेळ आली आहे. 

आता तुम्ही म्हणत असाल की हा कोण माजी पोलीस अधिकारी. तर त्या माजी पोलीस अधिकाऱ्याचं नाव किशोर पाटील आहे. कधी काळी पोलिसाच्या गणवेशात असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याची अवस्था आता बीकट झाली आहे. यांच्या विमनस्क अवस्थेला पाहून तुम्हाला देखील यावर विश्वास होणार नाही. हाच विमनस्क माणूस कधीकाळी पोलीस उपनिरीक्षक होता असं सांगितलं तर तुमचाच काय, कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, हे अगदी खरंय. माणूस नशेच्या आहारी गेला की त्याचं काय होऊ शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे किशोर पाटील. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर वरिष्ठांशी वाद झाला आणि किशोर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. अशात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक असलेले किशोर पाटील 10 वर्षांपूर्वी शिर्डीत आले. सुरुवातील पेपरविक्रीचं काम सुरू केलं होतं. त्यात त्यांचं झालं नाही आणि वाढत्या व्यसनामुळे भीक मागायला सुरुवात केली. व्यसनासाठी भीक मागणाऱ्या किशोर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन भिक्षेकरीगृहात पाठवलं.

शिर्डीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी काहीजण 5 विविध राज्यातील आणि काही महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यातील असल्याचं समोर आल आहे. शिर्डीतील वाढत्या भिकाऱ्यांचा मुद्दा सुजय विखे पाटलांनी समोर आणला होता. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, एखाद्या नशेच्या आहारी गेल्यानंतर एक उच्चशिक्षीत माणसावर भीक मागण्याची दुर्दैवी वेळ येते आणि आयुष्याची राखरांगोळी होते हेच खरंय.