नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान

खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..

वनिता कांबळे | Updated: Jan 27, 2025, 11:30 PM IST
नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान

Maharashtra Nahik Onion Crop : शेतातील तण मारण्यासाठी आणि पीक जोमात येण्यासाठी शेतकरी पिकांवर तणनाशकांची फवारणी करत असतात. मात्र नाशिक जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला. नाशकात कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळाले. नाशिकच्या देवळामध्ये हा सगळा प्रकार झालाय. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. 

पिकांचं चांगलं पोषण होण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारी खतं, जीवामृत आणि तणाची वाढ झाली असेल तर तणनाशकाचा वापर करतात.. मात्र नाशिकच्या देवळा जिल्ह्यात एक वेगळ्यात प्रकार समोर आलाय.. कांदा उत्पादक शेतकऱ्यानं पिकांत तण मारण्यासाठी मारलेल्या तणनाशकाने कांदा जळाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये तणनाशकामुळे नाशिकच्या तीन तालुक्यातील तब्बल दीडशे एकरातील कांदा या तणनाशकामुळे जळालाय. ज्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. 

तारेवरची कसरत करत नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी येथील शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र एका खाजगी कंपनीचे तणनाशक शेतक-यांनी फवारलं होतं, हे तणनाशक खूप विषारी निघाले पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीचे मोठं नुकसान झालं, अक्षरशः कांदे जळून खाक झालेत. तर 50 एकर कांद्याचे क्षेत्र खराब झाल आहे. हे समजताच कृषी मंत्र्यांनी या शेतीची पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधलाय...ताबडतोब कृषी अधिकाऱ्यांना झापल आहे.

कृषिमंत्र्यांनी तणनाशकाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले असून पंचनामे करून कंपनीकडून शेतक-यांना भरपाई देण्याचे आदेश दिलेत आहेत. मात्र, या बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होत आहे. कारण  कृषी विभाग या कंपन्यांवर कारवाई करण्यास जेवढी टाळाटाळ करेल तेवढे शेतकऱ्यांचे नुकसान जास्त होणार आहे.