शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?

Shivsena Abdul Sattar: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आलेत. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 21, 2025, 09:34 PM IST
 शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?
अब्दुल सत्तार

Shivsena Abdul Sattar: माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दूल सत्तार यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केलाय.सत्तारांनी लाटलेल्या अनुदान प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केलीय. त्यामुळे अब्दूल सत्तार अडचणीत आलेत.

दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही कुंभार यांनी केलीय. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.

विजय कुंभार यांनी सत्तारांवर काय केले आरोप? 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेतील अनुदानात घोटाळा झाल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केलाय. 2015 पासून 2 लाख वार्षिक अनुदान दिलं जात होतं. 4 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीत अनुदान वाढीचा कोणताही प्रस्ताव नव्हता. तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवण्यात आलं. 7 ऑक्टोबर 2024 ला अनुदान 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं. हे वाढीव अनुदान 16 शाळांना मंजूरही करण्यात आलं. या शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया 6 दिवसांत पूर्ण करण्यात आली. अनुदान मिळालेल्या शाळा अब्दुल सत्तांराच्या मतदारसंघातील आहेत. या शाळांचा अब्दुल सत्तारांशी संबंध असल्याचा संशय असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सांगतात. 

या प्रकरणाची चौकशी लावली जाणार?

राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोर होत असतात. याची चौकशी होईल त्यात काही तथ्य असेल तर कारवाई होईल अशी प्रतिक्रीया शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलीय. याआधीही मंत्री असताना अब्दूल सत्तारांवर अनेक आरोप झालेत. त्यात आता विजय कुंभार यांनी अब्दूल सत्तारांवर आरोप करत खळबळ उडवून दिलीय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लावली जातेय? का आणि त्यातून काय तत्थ बाहेर येतं हे पाहावं लागेल.