Bachhan and Ambani Wedding DJ : सेलिब्रिटींचं संगीत ते लग्न या सगळ्या गोष्टी किती लग्झरी आणि स्वप्नासारख्या असलेल्या गोष्टी आहेत असं वाटतं. सगळ्यांना त्यांच्या लग्नाचं आणि त्या आधीचे आणि नंतरच्या कार्यक्रमांचे फोटो पाहिजे असतात. इतकंच नाही तर त्यांचे फोटो पाहण्यासाठी सगळेच उत्साही असतात. त्यात त्यांनी कसे कपडे परिधान केले त्यांनी कसा लूक केला याविषयी माहिती जाणून घ्यायची असते. पण तुम्हाला माहितीये का या सगळ्या फोटोंपासून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या या ज्या गोष्टी असतात त्यासाठी परफॉरम करणाऱ्यांसाठी एक कॉन्ट्रॅक्ट असतो. याविषयी आता एका DJ नं सगळी माहिती उघड केली आहे.
लोकप्रिय DJ अकील याला सगळेच ओळखून आहेत. DJ अकील हा सेलिब्रिटींच्या खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करताना दिसतो. महत्त्वाचं म्हणजे तो फक्त तिथेच परफॉर्म करत नाही तर तिथे त्यानं परफॉर्म केलं आहे. त्यानं ऐश्वर्या-अभिषेक पासून अनंत अंबानीच्या संगीत कार्यक्रमापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या संगीतमध्ये परफॉर्म केलं आहे.
अकीलनं नुकत्याच सिद्धार्थ कननच्या मुलाखतीत सगळ्यांना आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय हे किती सुंदर अनुभव असतात त्याविषयी सांगितंलं आहे. अकीलनं यावेळी सांगितलं की सैफ आणि करीनाच्या संगीत कार्यक्रमाचं आयोजन हे ताजमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी खूप कमी लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. जवळपास 80 लोकं होते.
अभिषेक-ऐश्वर्याच्या जुहू येथे असलेल्या त्यांच्या घरी लग्नाची पार्टी ठेवण्यात आली होती. त्यात संपूर्ण जगातून वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रेक्षकांना बोलावण्यात आलं होतं. दोघांनी खूप मस्ती केली. ते सगळे माझे मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत मोठा झालोय. त्यामुळे आलेल्या सगळ्या पाहुण्यांची म्यूजिक टेस्ट मला माहित आहे. असं नव्हतं की कोणी अनओळखी आलं आणि त्यांनी परफॉर्म केलं. त्यातील बरेच लोक माझ्या लग्नात सहभागी झाले होते.
पुढे DJ अकीलनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाविषयी सांगितलं. त्याविषयी बोलताना अकील म्हणाला की वरातीत 13 स्टेज होते आणि त्यापैकी एका स्टेजवर होतो. हे खूप मजेशीर होतं. सगळ्या कलाकारांसोबत न थांबता साडे चार ते पाच तास मॅरोथॉनसारखं होतं. तुम्ही कोणाचंही नाव घ्या, ते तिथे उपस्थित होते.
हेही वाचा : नव्या नवेलीच्या वडिलांविरुद्ध फसवणूक, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण
दरम्यान, DJ अकीलनं कार्यक्रमातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. त्याचं कारण सांगत तो म्हणाला, मी एक NDA साइन केलं होतं. त्या नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंटमध्ये असं म्हटलं होतं की जर मी सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं, तर ते माझ्यावर गुन्हा दाखल करतील.