Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भाच्या संघाने मुंबईचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केलीय . गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदल घेत विदर्भाच्या संघाने 80 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभव करत गेल्यावर्षीच्या फायनलमध्ये पराभवाचा वचपा विदर्भाच्या संघाने काढला आहे.
मुंबईने रणजी ट्रॉफी 2024 मध्ये अंतिम फेरीत विदर्भचा पराभव करत विक्रमी 42 वे रणजी करंडक पटकावले होते. अशातच आता विदर्भाने मुंबईच्या स्टार खेळाडूंना कोणतीच संधी न देता शानदार विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारलीय. आता रणजी ट्रॉफीचा पुढील सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात होणार आहे.
विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यात खेळला जाणार फायनल सामना
2017-18, 2018 -19 सलग दोनदा रणजी ट्रॉफी अजिंक्यपद विदर्भाने पटकावल आहे. तर गेल्या सिजनमध्ये विदर्भचा फायनलमध्ये मुंबई संघाने पराभव केला होता. पहिल्या डावात विदर्भाच्या संघाने 383 धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघाचा डाव 270 धावावर 113 आटोपला. त्यामुळे विदर्भच्या संघाला धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात विदर्भाच्या संघाने 292 एवढी धावसंख्या केली त्यामुळे मुंबईच्या संघापुढे 406 धावांचे मोठे टार्गेटत होते. परंतु मुंबईचा दुसरा डाव 325 धावांवर संपुष्टात आल्याने विदर्भाच्या संघाने हा सामना 80 धावांनी जिंकला आहे.
तर मुंबईकडून दुसऱ्या डावात सलामीवीर आकाश आनंद 39 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर आयुष म्हात्रेने 18 धावा केल्या तर सिद्धेश लाडने 2 धावा केल्या. यामुळे मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला. या तिघांना हर्ष दुबेने बाद केले होते. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे हे 12-12 धावा करून बाद झाले. यामध्ये सूर्यकुमार यादव देखील 23 धावा केल्या. तो देखील यामध्ये अपयशी ठरला. मुंबईच्या गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंनी विदर्भाच्या गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी केली. शम्स मुलानी 46 तर शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावत ही खेळी पूर्ण केली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.