Mumbai Local Special Emergency Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेने शेष आपत्कालीन ब्लॉक जाहीर केला आहे. दोन दिवस हा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान कर्नाक आरओबी गर्डर समायोजनाचे काम पूर्ण करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान भायखळा आणि वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही.
कर्नाक आरओबी (फेज-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद स्टेशन दरम्यान किमी ०/१-२ वर करण्यासाठी २७ जानेवारी आणि २८ जानेवारी रोजी विशेष आपत्कालीन ब्लॉक घेणार आहे. आज २७ जानेवारी आणि २८ जानेवारी रोजी मध्यरात्री ००.३० ते पहाटे ४.वाजे पर्यंत भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान, धिम्या मार्गावर अप आणि डाउन तसेच जलद मार्गावर अप आणि डाउन (दोन्ही स्थानकांवर). आप आणि डाऊन हार्बर मार्ग, वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे
रेल्वे वाहतुकीच्या समस्यांमुळे ब्लॉक कालावधीत उपनगरीय लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ते भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाऊन मार्गावर सेवा बंद राहणार आहे
मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ठाणे,कुर्ला,दादर,परळ भायखळा स्थानकावरून सुटतील आणि संपतील तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा येथे संपतील आणि सुटतील. या दरम्यान मेल एक्सप्रेस ट्रेनवर देखील याचा परिणाम होईल.