11 Feb 2025, 06:24 वाजता
अकोल्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इंकमिंग
सध्या अकोल्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इंकमिंग सुरू झाली आहे. मागील महिन्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर अकोल्यात 'उबाठा'ला मोठी गळती लागली आहे. अकोल्याचे ज्येष्ठ नेते विजय मलोकार यांनी आता भाजपमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मालोकार यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेतलाय.
11 Feb 2025, 06:22 वाजता
पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याच्या 70 अधिकाऱ्यांना नोटीस; 10 कोटी 45 लाख रुपये...
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना लेखा परीक्षकाने नोटीस दिली आहे. सन 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षात कारखान्यातून 10 कोटी 45 लाख रुपयांचे नियमबाह्य अँडव्हान्स वाटप केल्याचा माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निबधंकाची परवानगी न घेता आणि पोटनियमात तरतूद नसताना तत्कालीन संचालक मंडळाने ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कर्मचारी आणि शेतकऱ्यांना नियमबाह्य अॅडव्हान्स वाटप केल्याने सदर नोटीस साखर विभागाचे लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी दिली आहे. 15 दिवसात सदर व्यक्तींनी खुलासा न केल्यास सहकार कायद्यानुसार कारवाई होणार. लेखा परीक्षकाच्या नोटीसीने साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
11 Feb 2025, 06:19 वाजता
कोबीला अवघा 50 पैसे प्रति किलो इतका निचांकी दर; हताश शेतकऱ्याने....
येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 25 हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती. मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा 50 पैसे प्रति किलो दराने या कोबी पिकाला निचांकी दर मिळाला, त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या कोबी पिकात शेळ्या मेंढ्या करण्यासाठी सोडून दिल्या आहेत.
11 Feb 2025, 06:17 वाजता
आज मंत्रिमंडळाची बैठक
आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. शिंदे गटाची प्री कॅबिनेट बैठक सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4