11 Feb 2025, 21:08 वाजता
अजित पवारांच्या बंगल्यावर बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
नितीन पवार, चेतन तुपे,रामराजे निंबाळकर,नवाब मलिक , सना मलिक, दिलीप वळसे पाटील,नितीन बनकर, अमोल मिटकरी,हिरामण कोसकर, सरोजनी अहिरे, मकरंद पाटील, मंत्री आदिती तटकरे, आशुतोष काळे, शिवाजीराव गरजे, ज्ञानेश्वर कटके, संजय मामा भरणे, सतीश काळे बाळासाहेब पाटील, विजयसिंह पंडित इंद्रजीत नाईकवाडी, विलास आणिक , संजय बनसोडे,पक्षाच्या बैठकीसाठी दाखल.
11 Feb 2025, 20:39 वाजता
अकोला - महिला शिक्षकांचा लैंगिक छळ व गैरकारभार प्रकरणी कारवाईचे निर्देश
पातूर येथील उर्दू शाळेतील महिला शिक्षकांचा लैंगिक छळ व गैरकारभार प्रकरणी शाळा संचालकावर कठोर कारवाईचे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाचे प्यारे जिया खान यांनी दिले आहेत. अकोला येथे धडक कारवाई करण्यात आली त्या 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) श्री. प्यारे जिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील शासन अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर येथे अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण व लैंगिक छळाच्या तक्रारी अल्पसंख्यांक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्यारे खान यांनी या शाळांना भेटी देत वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर व पोलीस उप अधिक्षक गजानन पडघन यांच्यासह अल्पसंख्यांक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. अकोल्याचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी अकोला विश्रामगृह येथे प्यारे खान यांनी भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली.
11 Feb 2025, 19:51 वाजता
एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार
एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार प्रदान कऱण्यात आला. दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला.
11 Feb 2025, 19:28 वाजता
वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची चौकशी संपली
रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपली आहे. साडेसहा तासाहून त्यांची चौकशी सुरू होती. रत्नागिरी एसीबी कार्यालयात नाईक दाम्पत्याची दुपारी 12 वाजल्यापासून चौकशी सुरु करण्यात आली होती. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने विविध कागदपत्रे सादर केली.
11 Feb 2025, 18:18 वाजता
रणवीर अलाहाबादिया, समय रैनाला महिला आयोगाचं समन्स
आक्षेपाह्र वक्तव्याबद्दल रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतरांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावलं आहे. 17 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
11 Feb 2025, 17:33 वाजता
मराठी भाषा संवर्धन व वृद्धिंगतसाठी केंद्रीय विद्यालयाची स्थापना करा, रविंद्र वायकरांची लोकसभेत मागणी
भारतात मराठी भाषा ही तिसर्या क्रमांकाची भाषा आहे, जीचा ८.३ कोटी जनता दैनंदिन जीवनात वापर करते. महाराष्ट्रात १२ हजार पेक्षा जास्त मराठी ग्रंथालय आहेत, परंतु या भाषेच्या संवर्धन व संशोधनासाठी अद्याप एकही केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ज्यामुळे मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषिक जनतेसाठी निश्चितच अभिमानाची बाब असून हा ऐतिहासिक निर्णय आहे. ज्यावेळी तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यावेळी केंद्र सरकारने 'सेन्ट्रल इंस्टीट्युट ऑफ क्लासिकल तमिल' ची स्थापना केली. यामुळे तामिल साहित्य, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद, संशोधन याच बरोबर उच्च शिक्षणाच्या वृधींगतासाठी अनेक साधन उपलब्ध करून देण्यात आले. यानिमित्ताने केंद्र सरकारला आग्रह करीत आहे की याच धर्तीवर मुंबईत 'सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडिज'ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राची खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली.
यात मराठी भाषेच्या संवर्धन, संरक्षण, संशोधन तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमीकरण सोईचे होणार आहे. याशिवाय मराठी भाषेला डीजीटल माध्यमांशी जोडण्यासाठी ई-लायब्रेरी, ऑनलाईन कोर्से आणि संशोधनाची सोय करणे आवश्यक आहे. यामूळे युवा पिढी तसेच संशोधनकर्ते यांना याचा लाभ मिळेल. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सरकारला आवश्यक पावले उचलायला हवीत, अशी मागणी ही खासदार रविंद्र वायकर यांनी यावेळी केली.
11 Feb 2025, 16:06 वाजता
मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पावर सादरीकरण
केंद्रीय अर्थसंकल्पात काय मिळालं आणि त्याचा महाराष्ट्राला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, यावर मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आलं. विविध सचिवांनी तासभर सादरीकरण केले. आरोग्य, शिक्षण आणि महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी तातडीने तसे प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जलजीवन मिशन, PM स्वानिधी, जिल्हास्थानी कर्करोग सेंटर्स, भारतनेट, शेतकरी, अमृत अशा विविध योजनेत मोठा निधी केंद्र सरकारने दिला. कोणत्या विषयात कोणता विभाग काय आणि कसा पुढाकार घेऊ शकतो, याचे सादरीकरण केले.
रेल्वेसाठी सुद्धा यंदा विक्रमी निधी मिळाला आहे. तातडीने प्रस्ताव सादर करा असा सांगण्यात आलं आहे.
11 Feb 2025, 15:25 वाजता
एआय तंत्रज्ञानामुळे लाखो लोकांचे जीवन बदलत आहे. काळानुसार, रोजगाराचे स्वरूप देखील बदलत आहे. एआयमुळे निर्माण झालेल्या रोजगार संकटावर उपाय शोधण्याची गरज आहे. तंत्रज्ञान नोकऱ्या हिरावून घेत नाही. एआयमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत.
11 Feb 2025, 14:56 वाजता
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय -
1) देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी.
* प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित
(जलसंपदा विभाग)
2) जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
* जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन
* शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन
(जलसंपदा विभाग)
3) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती
(मदत व पुनर्वसन विभाग)
11 Feb 2025, 14:09 वाजता
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत होणार बदल
मंत्रिमंडळ बैठकीत नियमात होणार बदल
एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी होणार बदल
याआधी मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्र्यांचा होता समावेश
एकनाथ शिंदे यांच्या समावेशासाठी नियमांत होणार बदल