Maharashtra Breaking News Live Updates : माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरात कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग. एका ठिकाणी सर्व क्षेत्रातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा..   

Feb 17, 2025, 20:16 PM IST
Maharashtra Breaking News Live Updates : माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय पटलावरही चित्र वेगळं नाही. याच महत्त्वाच्या घडामोडींच्या वेगवान अपडेट्स पाहा एका क्लिकवर... 

17 Feb 2025, 12:38 वाजता

समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलशी साधला संपर्क 

समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलला सांगितले होते की तो सध्या अमेरिकेत एक शो करत आहे, त्यामुळे तो भारतात येऊन त्याचे म्हणणे नोंदवू शकत नाही. समय रैनाने सायबर विभागाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले होते जे महाराष्ट्र सायबर विभागाने नाकारले आहे. आता समय रैनाला मुंबईत येऊन त्याचे म्हणणे नोंदवावे लागेल. जर रैना वेळेवर हजर झाला नाही तर त्याच्या नावाने दुसरे वॉरंट जारी केले जाईल, जर तो तरीही हजर झाला नाही तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. 

 

17 Feb 2025, 12:37 वाजता

मिरजेच्या एरंडोलीची जानव्ही देवीची यात्रा मोठे उत्साहात साजरी

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली मध्ये जानव्ही देवीची यात्रा मोठे उत्साहात साजरी झाली आहे.जागृत देवस्थान म्हणून एरंडोलीच्या जानव्ही देवीची ओळख आहे.दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात यात्रेचे आयोजन करण्यात येते, यंदाही मोठया उत्साहात यात्रा पार पडली,यानिमित्ताने जानव्ही देवी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती,तर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाळणे-खेळणे स्टॉलस देखील लागले होते,यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

 

17 Feb 2025, 12:35 वाजता

इंग्रजी येईना, पदवीधाराना नोक-या मिळेना!

इंग्रजी येत नसल्याने सरकारी विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांना वाढत्या बेरोजगारीला सामोरे जावे लागत असल्याचे नीती आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे. पदवीधरांना इंग्रजी येण्यासाठी या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढविण्याची शिफारस आयोगाने केली आहे.

17 Feb 2025, 12:13 वाजता

संभाजीनगरच्या वाळूज भागात ऍक्सिस बँकेचं एटीएम चोरलं

संभाजीनगरच्या वाळूज भागात ऍक्सिस बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडलीय. एटीएमधील 13 लाख 92 हजार रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा स्प्रे मारुन अवघ्या 6 मिनिटांत गॅस कटरच्या मदतीनं चोरट्यांनी एटीएम फोडलंय. घटनेवेळी ना सायरन वाजला, ना आलार्म त्यामुळे बँकेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान एटीएममधील चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय. 

 

17 Feb 2025, 12:09 वाजता

सुप्रिया सुळे बीडमध्ये; महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे परळी मध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या मसाजोग मध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने पहिल्यांदा सकाळी 9 वाजता मसाजोग मध्ये येतील. त्यानंतर त्या परळी शहरामध्ये हेलिकॉप्टरने जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुप्रिया सुळे यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी परवानगी प्रशासनाकडे मागण्यात आली आहे. 

17 Feb 2025, 11:55 वाजता

अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप 

अंजली दमानिया यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डीपीसाठी ऑनलाईन ऑर्डर केली होती..मात्र धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आऱोप दमानिया यांनी केलाय. घरापर्यंत आलेली ऑर्डर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे परत गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केलाय. त्यामुळे धनंजय मुंडेही काहीही करू शकतात असा आरोप त्यांनी केलाय. 

17 Feb 2025, 11:46 वाजता

सीसीआयच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विदर्भात कापूस कोंडी

सीसीआयच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने अमरावती जिल्हासह विदर्भातील 68 केंद्रावरील सीसीआयची आठवडाभरापासून शासकीय कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भातही मोठ्या प्रमाणात कापूस कोंडी निर्माण झाली आहे. शासनामार्फत करण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस खरेदीला प्रति क्विंटल 7421 रुपये भाव आहे. मात्र सीसिआयचं कापूस केंद्र बंद पडल्याने व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात भाव पाडले आहे. खुल्या बाजारात कापसाला दर 6900 ते 7000 पर्यंत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयाचं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन कराव लागत आहे. गेल्या तीन दिवसापासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान शासनाने तात्काळ कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून लवकर कापूस खरेदी सुरू न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याची शक्यता कापूस व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

 

17 Feb 2025, 11:29 वाजता

बीड प्रकरणावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल 

बीड प्रकरणावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजात जे नेतृत्व उभं राहीलं. त्यांनी जे आंदोलन सुरु केलं. त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस नावाचा म्होरा पुढे आणला आणि संतोष देशमुख खुनाचा वापर केला असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केलाय. धसांना याआधीच थांबायला हवं होतं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. 

 

17 Feb 2025, 11:18 वाजता

नागपुरकरांच्या आरोग्याशी खेळ; पाहा तिथं काय सुरुय.... 

नागपुरात लोकल तेलाच्या डब्ब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री. नागपूर पोलिसांनी केली कारवाई. निलेश दिलीप साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. यावेळी कारवाई दरम्यान खुले विकले जाणारे तेल हे डब्ब्यात भरले जात होते. त्यावर ब्रँडेड कंपनीचे लेबल लावले जाणारे स्टिकर मिळून आले. यावेळी बनावट लेबल लावलेले 28 तेलाचे डब्बे, शेकडो कागदी लेबल्स, तेलाचे डब्बे भरण्यासाठी मोटार पंप, पॅकिंग पट्टी असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

 

17 Feb 2025, 10:58 वाजता

मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा - अजित पवार

धनंजय मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा देण्याची अप्रत्यक्ष सूचना. अजितदादांची मुंडेंना नैतिकतेची शिकवण. यापूर्वी नेत्यांनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याची करून दिली आठवण. त्यामुळे आता राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात. धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा, असं म्हणत अजित पवारांनी दिलं उत्तर.