Maharashtra Breaking News Live Updates : माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरात कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग. एका ठिकाणी सर्व क्षेत्रातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा..   

Feb 17, 2025, 20:16 PM IST
Maharashtra Breaking News Live Updates : माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय पटलावरही चित्र वेगळं नाही. याच महत्त्वाच्या घडामोडींच्या वेगवान अपडेट्स पाहा एका क्लिकवर... 

17 Feb 2025, 20:15 वाजता

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात 

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाचे निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. आज ते नागपूर आत न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे निर्देशावर त्यांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. पोलीस कायदेशीर सोपस्कार पार करून त्यांना रीतसर अटक करून तुरुंगात पाठवण्याची दाट शक्यता आहे.

17 Feb 2025, 18:59 वाजता

मराठी भाषा विभागाचा मोठा निर्णय! साहित्य संमेलन ऑन व्हील्स ही संकल्पना राबवली जाणार 

मराठी भाषा विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून साहित्य संमेलन ऑन व्हील्स ही संकल्पना राबवली जाणार आहे. 1200 साहित्यिक ट्रेनने दिल्लीला जाणार असून ट्रेनमध्येच  हे साहित्य संमेलन रंगणार आहे. ट्रेनच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार असून ट्रेनला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार आहे. विरोधकांनी साहीत्य संमेलनावर केलेल्या टिकेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 

17 Feb 2025, 18:05 वाजता

सुरक्षेमध्ये कपात केल्याने शिवसेनेचे आमदार नाराज  

 शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने शिवसेना शिंदेंचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळत आहेत.  शिवसेनेचा अनेक आमदारांसोबत आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार असून  मात्र मंत्र्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा तशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

17 Feb 2025, 16:50 वाजता

20 फेब्रुवारी ला होणार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 

दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ 20  फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4: 30 वाजता शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यात, एनडीएची सरकार असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, आता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी होणार आहे. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याची निवड विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केली जाईल. 

17 Feb 2025, 16:36 वाजता

19 फेब्रुवारी रोजी शिवसेना खासदार प्रयागराजच्या दौऱ्यावर जाणार

19 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सर्व खासदार मिळून कुंभात स्नान करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

17 Feb 2025, 16:30 वाजता

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी टोल फ्री नंबर होणार जाहीर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाथीचा टोल फ्री नंबर जाहीर जाणार आहे. या माध्यमातून सदर नंबरवर कॉल केल्यास रुग्णालयासंदर्भात घर बसल्या माहिती मिळणार टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास शासकीय योजना असलेल्या रुग्णालयाची एकत्रित माहिती, आरोग्य सोयी सुविधांबद्दल माहिती, नजिकच्या रुग्णालयाची माहिती दिली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री  वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज केल्यानंतर या अर्जाची माहिती घेण्यासाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही. आता टोल फ्री नंबरवर माहिती उपलब्ध होणार आहे. 

17 Feb 2025, 16:28 वाजता

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी टोल फ्री नंबर होणार जाहीर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाथीचा टोल फ्री नंबर जाहीर जाणार आहे. या माध्यमातून सदर नंबरवर कॉल केल्यास रुग्णालयासंदर्भात घर बसल्या माहिती मिळणार टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास शासकीय योजना असलेल्या रुग्णालयाची एकत्रित माहिती, आरोग्य सोयी सुविधांबद्दल माहिती, नजिकच्या रुग्णालयाची माहिती दिली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री  वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज केल्यानंतर या अर्जाची माहिती घेण्यासाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही. आता टोल फ्री नंबरवर माहिती उपलब्ध होणार आहे. 

17 Feb 2025, 15:30 वाजता

रणवीर अलाहबादियाला महाराष्ट्र सायबरचं समन्स, 24 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश 

रणवीर अल्लाबडियाला महाराष्ट्र सायबरने 24 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. समय रैनाला उद्या सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

17 Feb 2025, 13:45 वाजता

'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी महसूल विभागाला देण्यात आले निवेदन. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेला छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत देण्यात आले निवेदन. ठाणे जिल्ह्यात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री नझाल्यास दोन दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा सकल क्रांती मोर्चा ने दिला आहे. 

 

17 Feb 2025, 13:03 वाजता

बदलापुरात भरधाव कारने महिलेला उडवलं अपघातात महिलेचा जागीच मृत्यू 

बदलापुरातल्या खरवई मधील पनवेलकर भूमी कॉम्प्लेक्सजवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकीनं एका महिलेला उडवलं. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. मथुरा रामा इरले असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलीय.