Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय पटलावरही चित्र वेगळं नाही. याच महत्त्वाच्या घडामोडींच्या वेगवान अपडेट्स पाहा एका क्लिकवर...
17 Feb 2025, 10:31 वाजता
अजित पवारांची तब्येत बिघडली
अजित पवारांची तब्येत बिघडलीये. त्यामुळे अजित पवारांचे आजचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. कालपासूनच त्यांची तब्येत बिघडली होती. दरम्यान आज औंधमध्ये होणा-या ITIच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत.
17 Feb 2025, 10:06 वाजता
धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पडलेल्या प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानाने वाचवला
अंधेरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर धावत्या एक्सप्रेस रेल्वेत चढत असताना पडलेल्या प्रवाश्याचा जीव RPF जवानाने वाचवला हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.काल १६-२-२०२५ रोजी लोकशक्ती एक्सप्रेस ही रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ०८ वरून रवाना होत असताना एका प्रवाशाने धावत धावत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला पण अंदाज न आल्याने तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये पडला तिथे ड्युटीवर तैनात असलेले सहाय्यक उपनिरीक्षक पीहुप सिंग यांनी ह्या प्रवाशाला बाहेर काढले. बाहेर काढले, ह्या प्रवासाचे नाव त राजेंद्र मांगीलाल, वय 40 वर्षे,असून तो अंधेरी सात बंगला वेस्ट येथे राहतो. त्याला अहमदाबादला जायचे होते आणि तो प्लॅटफॉर्मवर पोहोचका तेव्हा ट्रेन निघत होती. यामुळे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल गेला आणि खाली पडला तितक्यातच जवानानं त्याचा जीव वाचवला.
17 Feb 2025, 09:32 वाजता
नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ, यंत्रणा अलर्ट
शिंदे गटाच्या शिवसेनेचे आ.महेश शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासन यांच्यावर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणावर गंभीर आरोप केलेत. नवी मुंबई येथे काही दिवसापूर्वी एनसीबी ने मारलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या नवी मुंबई भागात वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे याला एपीएमसी मार्केट प्रशासन आणि नवी मुंबई पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमली पदार्थांच्या कारवाईत सापडलेला आरोपी देखील साताऱ्यातील कोरेगाव जवळच्या बिचुकले गावातील असून याचे राजकीय कनेक्शन काय आहे का? याविषयी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता सखोल चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आमदार महेश शिंदे यांनी केली.
17 Feb 2025, 09:31 वाजता
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सीसीटीव्ही अज्ञातानी फोडले
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सीसीटीव्ही अज्ञातानी फोडल्याचे समोर आले आहे. इतकच नाही तर सोलर पॅनल आणि लाईटचे वायर देखील अज्ञातानी कट केल आहे. शाळेतील मुलं सुरक्षित राहावी त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्या आहेत. पण बिद्री इथल्या जिल्हा परिषद शाळेमधील सीसीटीव्ही अज्ञातानी फोडल्यामुळे प्रशासन अलर्ट झालं आहे.
17 Feb 2025, 09:08 वाजता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली असून, सोमवारी दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना सर्व आमदार राहणार मुख्य म्हणजे कोकणातील सर्व आमदार उपस्थित असणार. दोन दिवसात पालकमंत्री पदाचा तिडा सुटण्याची शक्यता.
17 Feb 2025, 09:06 वाजता
सिडकोच्या घरांची बुधवारी सोडत
सिडकोच्या 26 हजार घरांची सोडत बुधवारी होणार. सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत करण्याचे निश्चित केले.
शनिवारी ही सोडत होणार असे सिडकोने जाहीर केले होते. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवर पाठविले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली.
17 Feb 2025, 08:33 वाजता
फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा, तापमान 35.4 अंशांवर; आरोग्यावर परिणाम
शहरातील तापमानाचा पारा शनिवारी 34.4 अंशांवर गेला. एका दिवसांत कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ झाल्याने नागरिकांना फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. त्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणाने आबालवृद्धांना सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे.
17 Feb 2025, 08:32 वाजता
कोल्हापूर शहरात जीबीएसचा आणखी एक बळी
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत जीबीएस सिंड्रोम आजाराने तिघांचा मृत्यू झाला असून कोल्हापूर शहरातील राजारामपुरी इथल्या 62 वर्षीय सुरेश नलवडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील जीबी सिंड्रोमचे रुग्ण. जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचे एकूण 25 रुग्ण.
17 Feb 2025, 08:20 वाजता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मुंबई दौऱ्यावर
निर्मला सीतारमण उद्योजक आणि कर व्यवसायिक यांच्यासोबत करणार चर्चा. यानंतर दुपारी 1 वाजता मुंबईतील नरिमन पॉइंट येथे होणार पत्रकार परिषद. संध्याकाळी निर्मला सीतारमण या आंतरराष्ट्रीय कस्टम दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारमण पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर.
17 Feb 2025, 08:18 वाजता
लहान मुलांमध्येही कर्करोगाचा वाढता धोका
मुंबईत कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना लहान मुलांमध्येही कर्करोगाचा वाढता धोका आहे. मुंबईच्या परळ येथील टाटा व अक्ट्रेक रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी लहान मुलांना होणारा कर्करोग वाढत आहे. 2023 या वर्षात तीन ते 15 या वयोगटातील 2 हजार 59 मुलांमध्ये कर्करोगाची नोंद करण्यात आली. 2024 मध्ये हे प्रमाण किंचित वाढलं. लहान मुलांमध्ये ल्यूकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग, ब्रेन किंवा स्पाइनल कॉर्ड ट्यूमर, न्यूरोब्लास्टोमा, विल्म्स ट्यूमर, लिम्फोमा आणि रेटिनोब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग) असे कर्करोगाचे प्रकार आढळतात. लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असले तरी योग्यवेळी त्याविषयी माहिती मिळाली व योग्यवेळी उपाय केल्यास 80 टक्के कर्करोग बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.