Aurangzeb and Hirabai Zainabadi Love Story : भारताच्या इतिहासात जेव्हा आपण झाकून पाहतो, तेव्हा सर्वात क्रूर मुघल सम्राट कोण होता, असं विचारल्यास औरंगजेब हे उत्तर मिळतं. औरंगजेबाने 49 वर्ष भारतावर राज्य केलं. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. हा असा क्रूर मुघल सम्राट कोणाच्या प्रेमात पडेल असं तुम्हाला वाटतं का? औरंगजेबाच्या हरममध्ये हजारो महिला होत्या. हरम हे मुघल सम्राट यांच्या अय्याशीचा अंडा मानला जात होता. यात हरममध्ये हिराबाई नावाची एक दासी होती. हिराबाईचं सौंदर्य पाहून औरंगजेबसारखा क्रूर सम्राट बेशुद्ध पडला होता. चला पाहूयात त्यांची प्रेमकहाणी.
अब्दुल हयी खान यांच्या 'मसर-अल-उमारा' या पुस्तकाचा हीराबाई आणि मुघल सम्राटचा प्रेमकाहणीचा उल्लेख आहे. ही कथा त्या काळाची आहे जेव्हा भारताचा सम्राट शाहजहान हयात होते. शाहजहाने त्याचा 35 वर्षांचा मुलगा औरंगजेब याला दख्खनचा राज्यपाल म्हणून पाठवलं होतं. दख्खनच्या राज्यपाल म्हणून औरंगजेबाचा हा दुसरा कार्यकाळ होता. तो आपले पद स्वीकारण्यासाठी औरंगाबादला जात होता. वाटेत मध्य प्रदेशात ताप्ती नदीच्या काठावर बुरहानपूर येते. औरंगजेबाची मावशी सुहेला बानो तिथे राहत होती. औरंगाबादला जात असताना, औरंगजेब त्याच्या मावशीला भेटण्यासाठी बुरहानपूर येथे थांबला. त्यांचे मामा मीर खलील खान-ए-जमान होते.
या पुस्तकात असं सांगितलं आहे की, औरंगजेब बुरहानपूरच्या जैनाबाद इथे बाग आहू खाना येथे फिरत होती, तेव्हा त्याची मावशीही तिच्या दासींसह फिरायला आली. जेव्हा औरंगजेबाने त्याच्या मावशीसोबत आलेल्या एका दासीला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे पाहत राहिला.
हमीदुद्दीन खान यांनी औरंगजेबाचे चरित्रात असं लिहिलंय की, मावशीच्या घरात, औरंगजेबाच्या नजरेपासून हरममधील महिलांना दूर ठेवण्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. पण एके दिवशी तो न कळवता घरात शिरला. त्यावेळी, चालताना भेटलेली तीच दासी झाडाची फांदी धरून हळूवारपणे गात होती. त्या दासीचे नाव हिराबाई होते पण सर्वजण तिला झैनाबादी म्हणत.
झैनाबादीला पाहताच औरंगजेब बेशुद्ध होऊ खाली पडला. असं म्हटलं जातं की ही माहिती मिळताच औरंगजेबाची मावशी अनवाणी त्याच्याकडे धावली आणि त्याला मिठी मारून रडू लागली. मात्र, काही क्षणातच औरंगजेब शुद्धीवर आला.
नंतर जेव्हा औरंगजेबाने आपल्या मावशीला संपूर्ण गोष्ट सांगितली तेव्हा तिने सांगितले की काका मीर खलील खान-ए-जमान खूप क्रूर आहेत. हे कळल्यानंतर ते मला मारतील. तो हीराबाईलाही मारेल. यावर औरंगजेब म्हणाला की तो त्याच्या काकांशी दुसऱ्या मार्गाने बोलेल आणि मुर्शीद कुली खान मार्फत खान-ए-जमानला त्याचा संदेश पोहोचवला.
बीबीसीच्या वृत्तानुसार, खान-ए-जमानने त्याला औरंगजेबाच्या हरममधून हिराबाईच्या बदल्यात चित्राबाई त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितलं. काही इतिहासकार या व्यवहाराशी सहमत नाहीत. मात्र औरंगजेब पहिल्याच नजरेत प्रेमात पडला यावर सर्वांचे एकमत आहे. त्याने आपल्या मावशीकडे विनवणी करून हिराबाईलाही मिळवले होते. त्याच वेळी, काही जण म्हणतात की त्याने चित्राबाईच्या बदल्यात हिराबाई मिळवली होती.
हिराबाईंचे खरं नाव बदलण्यामागे एक कथा आहे. इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, अकबराच्या काळात एक नियम बनवण्यात आला होता. यानुसार, हरममधील महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारली जात नव्हती. त्यांची नावं त्यांच्या शहराच्या किंवा जन्मस्थळाच्या नावावरून ठेवण्यात आली. म्हणूनच जेव्हा हिराबाई औरंगजेबाच्या हरममध्ये पोहोचल्या, तेव्हा त्या झैनाबादच्या असल्याने त्याचे नाव झैनाबादी महाल पडले.
औरंगजेबाच्या या प्रेमाची बातमी शाहजहानपर्यंतही पोहोचत होती. इतिहासकार रामानंद चॅटर्जी यांनी लिहिलंय की औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याने त्याचे वडील शाहजहान यांना या घटनेबद्दल सांगितले होते. असं म्हटलं जातं की दारा शिकोहने औपचारिक तक्रार केली होती, की औरंगजेब त्याच्या मावशीच्या घरातील एका दासीमुळे उद्ध्वस्त होत आहे. असं म्हटलं जातं की नोव्हेंबर 1653 मध्ये हिराबाई देखील औरंगजेबासोबत दौलताबादला गेल्या होत्या. मात्र त्यांचं निधन 1654 मध्ये झाले.