Washing Machine Using Tips : वॉशिंग मशीन आता प्रत्येकाच्या घरातील एक भाग आहे. मुलांना शाळेचे कपडे असो किंवा मग ऑफिसचे कपडे असो. महिलांच्या आयुष्यात कपडे धुण्याचं काम सोप करण्याचं काम मशीननं केलं आहे. पण प्रत्येक मशीनला आरामाची गरज असते. तर अशात प्रश्न येतो तो म्हणजे दररोज वॉशिंग मशीन वापरायचं नाही का? तर या मशीनला देखील आराम देण्याची गरज आहे? त्याविषयी आज जाणून घेऊया...
कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्सच्या रिटेल चेन कंपनी Croma नं वॉशिंग मशीन संबंधीत एक ब्लॉगमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कंपनीनं ब्लॉगमध्ये म्हटलं की सर्वसामान्यपणे प्रत्येक दिवशी वॉशिंग मशीनचा वापर करण तोपर्यंतच ठीक आहे जर तुम्ही त्या मशीनला एक तास वापरत आहात. त्यानंतर मशीनला आराम करण्यासाठी वेळ द्या. वॉशिंग मशीनला त्यात असलेल्या हीट रेजिस्टेंसला हॅंडल करण्यासाठी थोड्या आरामाची गरज असते. जेव्हा मशीनला एक किंवा दोनवेळा वापरतात. तेव्हा हे योग्य पद्धतीनं काम करतं कोणत्याही प्रकारच्या डॅमेजचा सिग्नल देत नाही.
क्रोमानं दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही वॉशिंग मशीनला रोज वापरत असाल तर हे लक्षात घ्या की तुमची मशीन ओव्हरलोड करु नका. कारण त्याचे पार्ट्स आणि न ही ओव्हरऑल मॅकेनिजम जास्त काळ या ओव्हरलोडला सांभाळू शकतील. जर तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर दरदोज करत असाल तर एक ते दीड तासापर्यंत करा. तर तुमच्या मशीनचं रेझिस्टंस, ड्रम डॅमेज आणि मोटर बर्न सारख्या घटनांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मशीनला एक दिवसात एक किंवा दोनवेळा वापर करु इच्छीता तर मीडियम बजेट मॉडेल खरेदी करा.
हेही वाचा : 'गोविंदाला मूर्ख लोक आवडतात; तो 4 मूर्खांसोबत बसतो अन् नंतर...', पत्नी सुनीता स्पष्टच बोलली
दरम्यान, कोणत्याही इलेक्ट्रिक अप्लायंसला ओवरयूज केल्यानं त्यात डॅमेज होण्याची शक्यता खूप वाढते. अशा पद्धतीनं वॉशिंग मशीनमध्ये ड्रम, मोटरमध्ये बर्न आणि इलेक्ट्रिक पार्ट्समध्ये रेझिस्ट्रेंस सारख्या समस्या पाहायला मिळतात. त्यामुळे वॉशर आणि इंटरनल पार्ट्सची देखील ड्यूरेबिलीटी कमी होते. त्यामुळे मशीन वापरताना ती 1 तास वापरण्याकडे लक्ष द्या त्याशिवाय ओव्हरलोड होईल तोपर्यंत वापरू नका.