IND vs PAK LIVE Score: विराट कोहलीच्या सेंच्युरीसह भारताची पाकिस्तानवर मात

IND vs PAK Live Score Updates in Marathi: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय.   

IND vs PAK LIVE Score: विराट कोहलीच्या सेंच्युरीसह भारताची पाकिस्तानवर मात

Champion Trophy 2025, India vs Pakistan LIVE Score and Updates: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय. 

 

23 Feb 2025, 21:54 वाजता

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने चौकार मारत, 51 वी सेंच्युरी करत पाकिस्तानचा पराभव केलाय. विराटने दमदार फलंदाजी करून शतक पूर्ण केलं आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून त्यांच्यावर मात करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलंय. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतावरील टेन्शन नसणार आहे.

23 Feb 2025, 20:12 वाजता

विराट कोहलीचं पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक

भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करून अर्धशतक पूर्ण केलं आहे. 62 बॉलमध्ये त्याने 51 धावा केल्या असून सध्या भारताला विजयासाठी 109 धावांची आवश्यकता आहे. 

23 Feb 2025, 20:11 वाजता

भारताला दुसरा धक्का! अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शुभमन गिल क्लीन बोल्ड 

भारत - पाक सामन्यात शुभमन गिलच्या विकेटच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे.  अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शुभमन गिल याला पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमद याने क्लीन बोल्ड केले. शुभमन गिलने 52 बॉलमध्ये 46 धावा केल्या. 

23 Feb 2025, 19:56 वाजता

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पूर्ण केल्या 14,000 धावा 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 14,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट हा जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. 

23 Feb 2025, 19:03 वाजता

शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर रोहित शर्मा क्लीन बोल्ड! 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची इनिंग सुरु असून विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल हे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मात्र यावेळी पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्माची विकेट घेतली. 15 बॉलवर 20 धावा करून तो बाद झाला. 

23 Feb 2025, 19:02 वाजता

भारताच्या इनिंगला सुरुवात, रोहित - शुभमनची जोडी मैदानात 

भारत - पाक सामन्यात भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं असताना कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. 

23 Feb 2025, 18:41 वाजता

 

IND vs PAK Live Score: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'?

बाबरच्या विकेटसह हार्दिक पांड्याने भारताचे विकेट्सचे खाते उघडले. पण चर्चेत अजून एक गोष्ट आली ती म्हणजे त्याच्या विकेट सोबत  टीव्ही स्क्रीनवर अचानक दिसलेला एक चेहरा. या व्यक्तीने केलेले सेलिब्रेशन. ती तरुणी हार्दिकची नवीन लेडी लव्ह आहे का? अशी चर्चा होत आहे. 

सविस्तर वाचा: IND vs PAK: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'? बाबर आझमच्या विकेटवर दिली 'ही' खास प्रतिक्रिया

 

23 Feb 2025, 18:28 वाजता

IND vs PAK Live Score: पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत

पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत परतला असून भारतासमोर विजयासाठी २४२ चं आव्हान ठेवण्यात आलं आहे. 

 

 

 

23 Feb 2025, 18:07 वाजता

IND vs PAK Live Score: भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral

भारत - पाक सामना म्हटले की यात ऍक्शन आणि ड्रामाचा तडका लागतोच. या हायव्होल्टेज सामन्यात बऱ्याचदा खेळाडू एकमेकांशी भिडताना तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं असेल. असाच राडा रविवारी झालेल्या भारत - पाक सामन्यात सुद्धा झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर वाचा: भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral

 

23 Feb 2025, 18:02 वाजता

IND vs PAK Live Score: पाकिस्तानला दुहेरी धक्का

43व्या षटकात कुलदीप यादवने पाकिस्तानला दुहेरी झटका दिला. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान अली आगाला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सलमान बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा झेल घेतला.सलमानला 24 चेंडूत केवळ 19 धावा करता आल्या. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या शाहीन आफ्रिदीला पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले. त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपला हॅट्ट्रिक करता आली नाही. नसीम शाहने त्याचा चेंडू आरामात ऑफ साइडने खेळला. पाकिस्तानने 43 षटकात 7 विकेट गमावत 200 धावा केल्या आहेत. 21 चेंडूत 20 धावा केल्यानंतर खुशदिल शाह नाबाद आहे. नसीम शाह त्यांच्यासोबत आले आहेत.