Champion Trophy 2025, India vs Pakistan LIVE Score and Updates: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय.
23 Feb 2025, 11:28 वाजता
IND vs PAK Live Score: एकूण वनडे रेकॉर्ड कसा आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडेमध्ये आतापर्यंत १३५ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तान संघाने 73 सामने जिंकले आहेत. म्हणजेच एकूण वनडे रेकॉर्डमध्ये पाकिस्तानचा वरचष्मा आहे.
23 Feb 2025, 11:04 वाजता
IND vs PAK Live Score: भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात शेवटचे कधी झाले होते?
14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत सर्वबाद 191 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली. याशिवाय इमाम उल हकने 36 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 30.3 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा करत सामना जिंकला.
23 Feb 2025, 10:42 वाजता
IND vs PAK LIVE Score: 14 महिन्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ महिन्यांनंतर वनडे सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी 2023 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान वनडे फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती.
23 Feb 2025, 10:36 वाजता
IND vs PAK LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महायुद्ध
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महायुद्ध होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून दोन्ही देशांमधील हा महान सामना रंगणार आहे.
23 Feb 2025, 10:26 वाजता
IND vs PAK LIVE Score: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार?
IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.
सविस्तर वाचा: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
23 Feb 2025, 10:18 वाजता
पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी
IND vs PAK LIVE Score: 2017मध्ये जेव्हा इंग्लंड आणि वेल्समधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत पाकिस्ताननं टीम इंडियाला पराभूत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती, त्याच पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी रोहित शर्माच्या टीम इंडियाकडे आहे.
23 Feb 2025, 09:46 वाजता
अन्यथा स्पर्धेतून बाहेर पडेल पाकिस्तान
IND vs PAK LIVE Score: रविवारची मॅच जिंकून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार यात शंकाच नाही. मात्र पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर टीम इंडियाचं कडवं आव्हान त्यांना रोखावं लागेल अन्यथा स्पर्धेतून ते बाहेर पडतील.
23 Feb 2025, 09:11 वाजता
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान किती वेळा आमनेसामने आलेत?
IND vs PAK LIVE Score: चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 5 वेळा आमनेसामने आलेत त्यात 2 वेळा भारतानं विजय मिळवला आणि 3 वेळा पाकिस्तानं विजय मिळवला आहे.
23 Feb 2025, 09:09 वाजता
पाकिस्तानची तयारी किती?
IND vs PAK LIVE Score: दुसरीकडे पाकिस्तानकडून सलामीच्या मॅचमध्ये बाबर आझम, सलमान अघा आणि खुशदील शाह न्यूझीलंडच्या बॉलर्सचा सामना करण्यात थोडेफार यशस्वी ठरले. बाकी त्यांची संपूर्ण टीम सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे भारताविरूद्धच्या मॅचसाठी कॅप्टन मोहम्मद रिझवानला नव्यानं रणनीती आखवी लागणार आहे दमानं टीमची आखणी करावी लागेल.
23 Feb 2025, 09:07 वाजता
आज विराटची बॅट जोरदार चालणार?
IND vs PAK LIVE Score: टीम इंडियाच्या बॅटिंगची कमान संपूर्ण पणे टॉप ऑर्डरवर असणार आहे. पण विराट कोहलीचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी कळीचा मुद्दा ठरु शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या मॅचमध्ये विराटची बॅट तळपेल अशी फॅन्सना आशा आहे. बॉलिंगमध्ये मोहम्मद शमीनं दणक्यात पुनरागमन करत बांगलादेशविरुद्धच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता त्याला हार्षित राणा आणि अक्सर पटेलनं मोलाची साथ दिली होती.