Champion Trophy 2025, India vs Pakistan LIVE Score and Updates: चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 6 गडी राखून भारताने पाकिस्ताचा पराभव केलाय.
23 Feb 2025, 17:53 वाजता
ND vs PAK Live Score: पाकिस्तानची अवस्था बिकट झाली असून, कुलदीप यादवने दुहेरी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सलमान आणि शाहीन आफ्रिदी बाद झाले आहे.
23 Feb 2025, 17:36 वाजता
IND vs PAK Live Score: अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला
क्रिकेटमधील महत्वाच्या सामन्यात निष्काळजीपणाचा शिक्षा किती मोठी असू शकते हे भारत - पाकिस्तान सामन्यात पाहायला मिळाले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी भारत - पाक सामना खेळवला गेला. या सामन्यात अक्षर पटेलची खतरनाक फिल्डिंग पाहून सर्वच थक्क झाले.
सविस्तर वाचा: अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला Champions Trophy 2025
23 Feb 2025, 17:30 वाजता
IND vs PAK Live Score: हार्दिकला मिळाले मोठे यश..
हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्याने बाबर आझमला बाद करत त्याची पहिली विकेट घेतली. आता त्याने सौद शकीलची विकेट घेतली. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात शकीलने अक्षर पटेलला झेलबाद केले. शकीलने 76 चेंडूत 62 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 विकेट घेतल्या. पाकिस्तानने 36 षटकात 4 विकेट गमावत 165 धावा केल्या आहेत. सलमान अली आगा ४० चेंडूत नाबाद ४० धावा आणि तय्यब ताहिर ५ चेंडूत नाबाद ४० धावा करत आहेत.
Wickets in quick succession for #TeamIndia
Hardik Pandya and Ravindra Jadeja with the breakthroughs
Pakistan down
Live https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy | @hardikpandya7 | @imjadeja pic.twitter.com/xoL7JDuPS2
— BCCI (@BCCI) February 23, 2025
23 Feb 2025, 17:21 वाजता
IND vs PAK Live Score: रिझवानची विकेट
मोहम्मद रिझवानची विकेट पडली. त्याने शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याचा चेंडू झेलला गेला पण पुढच्याच षटकात अक्षर पटेलने त्याला बोल्ड केले. रिजवान 44 धावा करून बाद झाला.
23 Feb 2025, 16:58 वाजता
IND vs PAK Live Score: 'ही' फॅन गर्ल टी-शर्टच्या खाली पॅन्ट घालायलाच विसरली
Champion Trophy 2025 India Vs Pakistan, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रितिकसोबत असलेल्या एका फॅन गर्लने भारतीय जर्सी परिधान केली आहे पण खालची पॅन्ट घालायला विसरली असे वाटतं आहे.
सविस्तर वाचा: IND vs PAK: रोहितच्या बायकोसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? टी-शर्टच्या खाली पॅन्ट घालायलाच विसरली, सोशल मीडियावर चर्चा
23 Feb 2025, 16:38 वाजता
IND vs PAK Live Score: पाकिस्तानने केल्या 100 धावा पूर्ण
पाकिस्तानचे फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सौद शकील संथ फलंदाजी करत आहेत. असे दिसते की दोघेही कसोटी सामना खेळत आहेत. पाकिस्तान संघाने 25.3 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. त्याने 26 षटकात 2 गडी बाद 107 धावा केल्या आहेत. शकीलने 51 चेंडूत 37 धावा केल्यानंतर नाबाद आहे. त्याचबरोबर कर्णधार मोहम्मद रिझवानने 53 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या आहेत.
23 Feb 2025, 16:16 वाजता
IND vs PAK Live Score: चौकाराचा दुष्काळ संपला
16 व्या षटकात अक्षर पटेलच्या पहिल्या चेंडूवर सौद शकीलने चौकार मारला. त्याने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चौकार मारला. षटकात एकूण 7 धावा आल्या. 32 चेंडूंत चौकार मारला.
23 Feb 2025, 16:03 वाजता
IND vs PAK Live Score: पाकिस्तानची संथ फलंदाजी
15 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या केवळ 53 धावा आहे. रिजवान आणि सौद शकील क्रीजवर आहेत. खेळपट्टी थोडी संथ असल्यामुळे वेगवान फलंदाजी करण्यात अडचणी येत आहेत.
23 Feb 2025, 15:54 वाजता
IND vs PAK Live Score: शमी-पांड्याने पाकिस्तानला रोखले
14 षटकांनंतर पाकिस्तानच्या 61 धावा आहेत, त्यांच्या 2 विकेट पडल्या आहेत. शमी आणि पांड्याने पाकिस्तानला बांधून ठेवले आहे. पांड्याने 4 षटकात केवळ 14 धावा दिल्या आहेत. तर शमीने 18 धावा केल्या आहेत.
23 Feb 2025, 15:33 वाजता
IND vs PAK Live Score: शमीचा वनडेत नकोसा विक्रम
एकदिवसीय सामन्यात एका षटकात ५ वाईड बॉल टाकणारा मोहम्मद शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.