मुलीला दिवस गेल्याचे कळताच आई बिथरली अन् तिने...; नालासोपाऱ्यात महिलेचे क्रूर कृत्य

Nalasopara Crime News: मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर येताच आई चिडली अन् तिने मुलीला जीवे ठार मारले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2025, 09:10 AM IST
मुलीला दिवस गेल्याचे कळताच आई बिथरली अन् तिने...; नालासोपाऱ्यात महिलेचे क्रूर कृत्य
nalasopara crime news mother and minor sister killed pregnant daughter

Nalasopara Crime News: मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने पोटच्याच लेकीची हत्या केली आहे. आईने गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाला आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात धाकट्या मुलीनेही बहिणीच्या हत्येत आईला मदत केल्याचे समोर आले आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता दुबे ही तरुणी नालासोपारा येथील तिच्या आई-वडिलांसह राहत होती. गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांना अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र जेव्हा पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा तिचा चेहरा सुजलेला होता तसंच दोन्ही हातांवर चावा घेतल्याचे निशाण होते. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. 

शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर पोलिसांनीही एकच धक्का बसला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अस्मिताचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. पोलिसांनी अस्मिताच्या आईला ताब्यात घेतल्यानंतर तिनेच अस्मिताची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

सविस्तर वाचाः 'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?

अस्मिता गर्भवती राहिल्याचे आईला कळताच ती संतापली. त्यानंतर तिने मुलीला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिची 17 वर्षांच्या लहान मुलीने अस्मिताचे पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातांवर चावा घेतला. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. ती हत्या लपवण्यासाठी त्यांनी अस्मिताने गळफास घेऊन तिची हत्या केल्याचा बनाव रचला. त्यानुसार पोलिसांना फोन करुन माहिती दिली. 

पोलिसांनी आई ममता दुबे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, अल्पवयीन मुलीला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीची 12 वीची परीक्षा सुरू आहे. आई ममता दबे हिला न्यायालयात हजर केले असता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अमरसिंह यांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.