Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 16, 2025, 22:02 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

16 Feb 2025, 08:03 वाजता

महाकुंभातून परतणा-या भाविकांच्या बसला आग, एकाचा मृत्यू

 

Bus Fire : प्रयागराज महाकुंभात स्नान करून परतणाऱ्या राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील भाविकांच्या स्लीपर बसला भीषण आग लागली.. या आगीत होरपळून एका भाविकाचा मृत्यू झालाय.. तर 29 प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्यानं त्यांचा जीव वाचला.. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही दुर्घटना घडली..

16 Feb 2025, 07:56 वाजता

पुण्यात आणखी एकाला GBSची लागण

 

Pune GBS : पुणे शहरात रोज जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असून रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्य कमी दिसते. आतापर्यंत १२४ GBS बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज नव्याने एक रुग्ण सापडला. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली असून त्यातील १८१ रूग्णांVE जीबीएसचं निदान झालंय. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळतायत

16 Feb 2025, 06:51 वाजता

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

 

Railway Megablock : विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या CSMTते विद्याविहारदरम्यान, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. या मेगाब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे..

16 Feb 2025, 06:48 वाजता

नवी दिल्ली स्टेशवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

 

New Delhi Railway Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. यासाठी देशभरातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून लोक तेथे जात आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे... याशिवाय 10 जण गंभीर जखमी असल्याचं समजतंय... अचानक रात्री 8 वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले... यामुळे हा गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्म क्रमांक 14-16 वर ही घटना घडल्याचे समजतंय.