16 Feb 2025, 13:26 वाजता
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Operation Tiger : एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय...सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका असं म्हणत दोन तासांसाठी आमच्या हातात ईडी, सीबीआय द्या म्हणजे अमित शाहा सुद्धा मातोश्रीवर य़ेऊन आमच्या पक्षात सामील होतील असं वक्तव्य राऊतांनी केलं....
16 Feb 2025, 12:55 वाजता
बीड जिल्ह्यात 1 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू
Beed : बीड जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू करण्यात आलेत... जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशावरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत..जिल्ह्यात मराठा, ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय... एक मार्च पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
16 Feb 2025, 11:51 वाजता
पुरंदर विमानतळीची पायाभरणी
Purandar Airport : पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या 'कनेकटिव्हिटीला' प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे... पुरंदरमधील वनपुरी, उदाचीवाडीसह सात गावांमधील पायाभूत सुविधांची विकास कामांना वेग दिला जाणार आहे... पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ परिसरात रस्त्यांचे जाळेही पीएमएआरडीएकडून विस्तारित करण्यात येणार आहे.636 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा
16 Feb 2025, 11:49 वाजता
कुंभमेळ्याबाबत लालूंचं वादग्रस्त वक्तव्य
Lalu Prasad Yadav On Mahakumbhmela : नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीवरुन आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी टीका केलीये.. मात्र टीका करताना त्यांनी महाकुंभबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.. चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली...
16 Feb 2025, 10:32 वाजता
फरार कृष्णा आंधळेची प्रॉपर्टी जप्त होणार
Krushna Andhale Property Seized : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त केली जाणार आहे.. कोर्टानं याबातचे आदेश दिलेत.. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कृष्णा आंधळे फरार झालाय.. अद्यापही पोलीसांना त्याचा ठावठिकाणा लागत नाहीये.. त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी CIDनं केली होती.. दरम्यान कोर्टानं ही मागणी मान्य केली असून आता लवकरच त्याची संपत्ती जप्त केली जाणार आहे.. यामध्ये कृष्ण आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केज येथील बँकेत 3 खाते देखील आहेत..
16 Feb 2025, 09:21 वाजता
पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे GBSची लागण-अजित पवार
Ajit Pawar On GBS : जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता. पण या आजाराचं संक्रमण होण्यामागील आणखी एक कारण आता समोर येत आहे. फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे अशी महिती त्यांनी दिली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Feb 2025, 09:18 वाजता
लाडक्या बहिणींची संख्या आणखी कमी होणार?
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे... विविध योजनांचा लाभ घेणा-या महिलांना वगळल्यानंतर आता अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय...उत्पन्नाबाबतच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Feb 2025, 09:13 वाजता
67 दिवसानंतंरही कृष्णा आंधळे सापडेना
Beed Krushna Andhale : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 67 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही.. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Feb 2025, 09:10 वाजता
बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार
Beed Jail : बीडच्या जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.... याच कारागृहात वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेलं आहे...देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीने बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत... याच अनुषंगाने सोमवारी पोलीस अधीक्षकांची टीम याचा आढावा घेणार आहे...बीड जिल्हा कारागृह निजामकालीन असून इमारत कमकुवत आहे... कारागृहातील सीसीटीव्हीचे नूतनीकरण करण्याचेच आहे. त्याबरोबरच सुरक्षा यंत्रणा देखील अद्यावत गरजेचे असल्याचं यात म्हटले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Feb 2025, 09:04 वाजता
GBSबाधित गावांना शुद्ध पाणीपुरवठा
Pune Water : पुणे महापालिकेत समाविष्ट 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेले पाणी थेट धरणातून दिले जाते... यातील किरकटवाडी, नांदेड गाव, धायरी, नांदोशी या गावांमध्ये जीबीएस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत... त्यामुळे भविष्यात अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या आजारांना अटकाव घालण्यासाठी 12 गावांना आता शुद्ध पाणी दिले जाणार आहे...प्रत्येकी 100 एमएलडी क्षमता असलेले दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत, यासाठी 890 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे... मात्र, हे काम 2 टप्प्यांत केले जाणार असल्याने महापालिकेकडून पहिल्या टप्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -