16 Feb 2025, 22:01 वाजता
उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रकृती बिघडली
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रकृती बिघडली.. नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द..अजित पवार ओझरहून पुण्याकडे रवाना...प्रकृती बिघडल्याने अजित पवारांचे कार्यक्रम रद्द
16 Feb 2025, 21:39 वाजता
मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद
Mumbai : मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी वाद पाहायला मिळाला....दक्षिण मुंबईतील रुपम शोरूमच्या मॅनेजरने हिंदीचा आग्रह धरल्यानं वाद झाला....रुपम शोरुमच्या अमराठी मॅनेजरनं तरुणाला गुजराती आणि हिंदी भाषेतून बोलण्याचा आग्रह धरला....तरुणाच्या तक्रारीनंतर शिवसेना UBTचा रुपमला दणका...रुपमच्या मॅनेजरला मागायला लावली माफी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Feb 2025, 19:27 वाजता
'पालकमंत्रिपदाचा निर्णय सीएम घेणार', अजित पवारांची माहिती
Ajit Pawar : पालकमंत्रिपदाबाबतचा अधिकार राज्याच्या प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांना आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. ते जो निर्णय घेतील तो मान्य असणार, असंही अजित पवार म्हणाले. तर पालकमंत्रिपादाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच हा तिढा सटणारे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Feb 2025, 18:22 वाजता
बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच?
Sarpanch Bapu Andhale Murder Case : परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच येणार आहे.. 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार आहे. बबन गित्ते याला अधिकृतरित्या फरार घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्याच्या संपत्तीची माहिती जमा केली जातेय. पुढील दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर टाच येणार असल्याने शरणागती शिवाय बबन गित्तेकडे पर्याय राहणार नाही
16 Feb 2025, 17:17 वाजता
नाशिक महापालिकेचं 3 हजार 53 कोटींचं बजेट सादर
Nashik Municipal Corporation Budget : नाशिक महापालिकेचं 3 हजार 53 कोटींचं बजेट सादर...नाशिककरांच्या मालमत्ता करात दोन टक्क्यांची वाढ...2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढीचा निर्णय...आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटींची तरतूद...मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलं बजेट.. प्रशासकिय राजवटीत सादर होणारे यंदाचं तिसरे बजेट
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Feb 2025, 16:43 वाजता
जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1.69 कोटींची मालमत्ता जप्त
Jalgaon : जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची १ कोटी ६९ लाखाची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना हा मोठा धक्का मानला जातोय.. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी ईडीने ही कारवाई केली....नाशिक आणि जळगावमधील संपत्तीचा यात समावेश आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Feb 2025, 16:27 वाजता
'43 वर्षांत क्षमतेनुसार संधी मिळाली नाही', भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत
Bhaskar Jadhav : विधानसभा निकालानंतर आमदार भास्कर जाधवांच्या नाराजीची मालिका सुरूच झालीये. 43 वर्षात आपल्या क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं म्हणत जाधव पुन्हा एकदा व्यक्त झाले. मात्र नंतर जाधवांनी एक पाऊल मागे टाकत सारवासारव केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Feb 2025, 15:20 वाजता
न्यू इंडिया बँक अपहारप्रकरणी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत कोठडी
New India Co-op Bank Case : न्यू इंडिया बँक अपहारप्रकरणी हितेश मेहताला कोठडी...हितेशला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी... धर्मेश पौन यालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी... 122 कोटींच्या अपहाराचा हितेश मेहतावर आरोप
16 Feb 2025, 14:17 वाजता
लव्ह जिहादचं वास्तव उघड-देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis On Love Jihad : राज्यात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत आहेत.. लव्ह जिहादचं वास्तव उघडकीस आलंय.. एका धर्माच्या व्यक्तीनं दुस-या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणं गैर नाही.. मात्र खोटं बोलून लग्न करणं आणि मूल जन्माला घालून सोडून देणं हे अतिशय गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत... यावर कारवाई करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगीतलंय..
16 Feb 2025, 14:02 वाजता
फरार आरोपी बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच येणार
Beed : परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच येणार आहे.. 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार आहे. बबन गित्ते याला अधिकृतरित्या फरार घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्याच्या संपत्तीची माहिती जमा केली जातेय. पुढील दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर टाच येणार असल्याने शरणागती शिवाय बबन गित्तेकडे पर्याय राहणार नाही