Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 15, 2025, 22:08 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Feb 2025, 12:40 वाजता

केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचं निधन

 

Kesari Patil : 'केसरी'चे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ  पाटील यांचं आज पहाटे निधन झालं... ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते... वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली... मोठ्या कष्टानं या कंपनीला जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास आणलं... त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधलं जायचं...

 

15 Feb 2025, 12:36 वाजता

संभाजीनगरमध्ये भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का

 

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजपने उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरेश बनकर शिवसेना UBT मध्ये  गेले होते. त्यांनी सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार विरोधात निवडणूक लढवली होती. 

15 Feb 2025, 11:58 वाजता

सांगलीत GBSमुळे 2 जणांचा मृत्यू

 

Sangli GBS : सांगलीमध्ये GBSच्या दोन रुग्णांचा मृत्यू झालाय..मृतांमध्ये कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील 14 वर्षाच्या मुलाचा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. या दोघांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते,गेल्या पंधरा दिवसात या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत,गेल्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा आणि जिल्हा बाहेरील 15 रुग्ण दाखल झाले होते, त्यामधील सहा रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत,तर या मधल्या दोघांचा उपचारांमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

15 Feb 2025, 11:38 वाजता

'पॅचअप'वरुन वादंग?

 

Sangli GBS : सांगलीमध्ये GBSच्या दोन रुग्णांचा मृत्यू झालाय..मृतांमध्ये कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील 14 वर्षाच्या मुलाचा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येथील 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. या दोघांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते,गेल्या पंधरा दिवसात या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत,गेल्या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा आणि जिल्हा बाहेरील 15 रुग्ण दाखल झाले होते, त्यामधील सहा रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत,तर या मधल्या दोघांचा उपचारांमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 11:09 वाजता

पंढरपूर शहरात गिया बार्रेचे दोन संशयित रुग्ण

 

Pandharpur GBS : पंढरपूर शहरात गिया बार्रेचे दोन संशयित रुग्ण आढळून आलेत.. या दोन्ही रुग्णांमध्ये गिया बार्रेची लक्षणं आढळलीत.. या दोघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागं झालं असून आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण  सुरु करण्यात आलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 10:05 वाजता

 सातपुडा डोंगररांगात पाणीटंचाईच्या झळा 

 

Nandurbar : फेब्रुवारी महिन्यातच नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यात.. हंडाभर पाडण्यासाठी आदिवासी महिलांना 4 ते 5 किलोमीटर प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे... महिलांना 200 फूट खोल दरीत उतरून पिण्याचे पाणी आणावं लागतं आहे.. राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागतंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 09:54 वाजता

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ 

 

Champions Trophy Price Money : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे...19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे सुरू होणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षीस रकमेची घोषणा केली असून विजेत्या संघाला 19 कोटी रुपये मिळणार आहेत...विशेष म्हणजे गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 53% वाढ करण्यात आली आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 09:04 वाजता

कर थकवणाऱ्यांना मुंबई मनपचा दणका

 

BMC In Action Mode : कर थकवणा-या मालमत्ताधारकांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केलीय... महापालिकेने शुक्रवारी चांदिवलीतील 18 मालमत्ताधारकांच्या 178 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत... संबंधित मालमत्ता धारकांनी 21 दिवसांच्या आत थकित कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करणार असल्याचं सांगितलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 09:02 वाजता

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

 

Railway Megablock : विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या CSMTते विद्याविहारदरम्यान, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. या मेगाब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 08:42 वाजता

राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत?

 

Political Party In RTI : निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना आरटीआयच्या कक्षेत आणण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आलीय...या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलं आहे... तसेच आता या याचिकांवर एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा -