Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 15, 2025, 22:08 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Feb 2025, 07:54 वाजता

डाळींच्या दरात मोठी घसरण 

 

Pulses Rate : चालू हंगामात उत्पादानात चांगली वाढ झाल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे... दोन महिन्यांत डाळींच्या दरात सरासरी 50 ते 60 रुपयांची घसरण झालीय... पुढील काळातही डाळींच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जातेय... डाळींच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 07:51 वाजता

मुंबई एअरपोर्टवर 6.28 कोटींचं सोनं जप्त

 

Mumbai Airport Gold Seized : मुंबई विमानतळावर 6.28 कोटी रुपयांचं 7 किलो सोने जप्त करण्यात आलंय...डीआरआयने सोने तस्करीप्रकरणी तीन इराणी नागरिकांना ताब्यात घेतलंय...तिघेही दुबईहून मुंबईत आले होते...त्यांच्या बँगांची तपासणी केली असता 7 किलो सोन्याचे बार सापडले होते... पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून अधिकचा तपास सुरू आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Feb 2025, 07:49 वाजता

अटल सेतू 13 तास मॅरेथॉनसाठी बंद

 

Atal Setu Closed : शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू मॅरेथॉनसाठी तब्बल 13 तास बंद राहणार आहे...  शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे... एमएमआरडीएकडून रविवारी मुंबईत मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे... या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.... त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -