15 Feb 2025, 20:38 वाजता
शिंदे, फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर नाही- अजित पवार
Ajit Pawar On Mahayuti : शिंदे, फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर नाही-अजित पवार...कोल्ड वॉरची माहिती धादांत खोटी-अजित पवार...महायुतीत सर्वकाही ठीक-अजित पवार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 19:27 वाजता
न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक अनियमितताप्रकरणी हितेश मेहता अटकेत
New India Cooperative Bank : न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला अटक केलंय. 122 कोटींचा अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आपल्या ओळखीच्या लोकांना मेहतानं 122 कोटी रुपये दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. मेहताला आर्थिक गुन्हे शाखेत आणलं होतं. तिथे त्याची चौकशी झाली. कोरोना काळात ही रक्कम काढायला सुरुवात केल्याची कबुली हितेश मेहतानं दिल्याचं समजतंय. मेहता हा खातेप्रमुख असल्यानं बँकेची रोकड हाताळण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. तसंच GST आणि TDS पाहणे सोबतच संपूर्ण खातं पाहण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती. मुंबईतील प्रभादेवी कार्यालयाच्या तिजोरीतून 112 कोटी रुपये तर गोरेगाव कार्यालयाच्या तिजोरीतून 10 कोटी रुपये गायब झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
15 Feb 2025, 19:09 वाजता
'विनायक राऊतांमुळे विधानसभेत आपला पराभव', टू द पॉईटमध्ये राजन साळवींचा आरोप
Rajan Salvi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केली. त्यामुळेच आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असा थेट आरोप नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांनी केला. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 18:22 वाजता
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होईल-आशिष शेलार
Ashish Shelar On Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होईल. आगे आगे देखीये होता है क्या असं सूचक विधान, भाजपच्या आशिष शेलार यांनी केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षातले अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचं शेलार यांनी नागपूरमध्ये सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 17:29 वाजता
सुनील तटकरेंनी जिल्हाध्यक्षाला झापलं
Sunil Tatkare On Arvind Chavan : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी जिल्हाध्यक्षाला झापलं...भाषणात नाव न घेतल्याच्या आक्षेपावरुन झापलं..'आमदारांआधी तुमचं नाव घेतलं, तुमचं लक्ष नव्हतं'...सुनील तटकरेंनी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाणांना सुनावलं...थोडी शिस्त लागली की आपोआप ऐकायला येईल'...सुनील तटकरेंचा अरविंद चव्हाणांना टोला
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 16:45 वाजता
माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना कोर्टाचा झटका
Pradeep Sharma : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोर्टाचा झटका...अँटिलिया स्फोटकं प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार...विशेष NIA कोर्टानं प्रदीप शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला... 20 जिलेटिन स्टिक असलेली बॅग अँटिलियाबाहेर आढळली होती...अंबानी कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये गाडीमध्ये ठेवली होती...25 फेब्रुवारी 2021 रोजी अँटिलियाजवळ स्कॉर्पिओ गाडी उभी केली होती...ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना 17 जून 2021 रोजी अटक करण्यात आली होती....तर 23 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता....प्रदीप शर्मा सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
15 Feb 2025, 16:05 वाजता
रत्नागिरीतील तिघांची शिवसेना UBTतून हकालपट्टी
ShivSena UBT : रत्नागिरीतील तिघांची शिवसेना UBTतून हकालपट्टी...जिल्हा प्रमुख, सहसंपर्कप्रमुखाचा समावेश..पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका...राजेंद्र महाडिक, विलास चाळके, रोहन वनेंची हकालपट्टी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 15:13 वाजता
लाडक्या बहिणींना 8 दिवसांत पैसे मिळणार- अजित पवार
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना 8 दिवसांत पैसे मिळणार'... उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी माहिती...कालच चेकवर सही केलीय-अजित पवार..'3 हजार 500 कोटींच्या चेकवर सही केली'...फेब्रुवारीचा हप्ता 8 दिवसांत मिळणार-अजित पवार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
15 Feb 2025, 13:18 वाजता
तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-याला जॅकचा आधार
Tuljabhawani Temple : तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभा-याला जॅकचा आधार दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीये... मुख्य गाभा-यातील शिळांना तडे गेलेत. या तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवण्यात आल्यात.. यामुळे तुळजाभवानी देवीचा गाभारा धोकादायक बनलाय. पुरातत्व विभागाकडून या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरु आहे.. या दरम्यान गाभा-याला जॅक लावण्यात आल्यानं भाविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
15 Feb 2025, 13:09 वाजता
अंधेरीत दुप्पट परताव्याच्या आमिषाने फसवणूक
Andheri Fraud : रोख रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अंधेरी रेल्वे स्थानकात तीन आरोपींनी एका व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केली... 50 लाख रुपयांऐवजी खेळण्यातील नोटा संबंधित व्यक्तीला दिल्याचं समोर आलंय... तुम्ही जेवढे पैसे आणाल, त्याच्या दुप्पट पैसे दिले जातील, असे आरोपींनी तक्रारदाराला सांगितले. या आमिषाला तक्रारदार बळी पडले.