Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 13, 2025, 22:40 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

13 Feb 2025, 09:13 वाजता

मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस

 

Dhananjay Munde : विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय.  24 फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयात याबाबत सुनावणी होणारेय. धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नाही. त्यामुळे करुणा मुंडेंनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. याची दखल घेत मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Feb 2025, 08:16 वाजता

शिर्डीत साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात

 

Shirdi : शिर्डीत साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात झालीये..  देश विदेशातील लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत..  महिला आणि विद्यार्थ्यांनीही या परिक्रमेत सहभाग घेतलाय. चित्ररथावरील देखावे , ढोल - ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासुन सकाळी साडेपाच वाजता परिक्रमेस सुरूवात झालीये.. 

13 Feb 2025, 07:41 वाजता

पुण्यात गिया बार्रेचे 6 नवे रुग्ण

 

GBS Update : राज्यात GBS रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आतापर्यंत 203 रुग्णांचा GBSची लागण झालीय...तर GBS मुळे आठ जणांचा मृत्यू झालीय. पुण्यात 24 तासांच 6 नव्या रुग्णांची नोंद झालीय. सर्वाधिक GBS चे रुग्ण हे पुण्यात आहेत. 

13 Feb 2025, 07:36 वाजता

तळोजामध्ये होणार सिडकोच्या 26 हजार घरांची सोडत

 

Cidco Home : सिडकोच्या २६ हजार घरांसाठी १५ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. तळोजा नोडमध्ये ही सोडत काढली जाणार आहे. या विभागात विक्रीविना पडून असलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पस्थळावरच सोडत काढण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली, बामणडोंगरी, खारकोप, मानसरोवर या भागातील २६हजार घरांची विक्री योजना जाहीर केली होती. सासाठी दीड लाख अर्ज आलेत.. या अर्जांची अंतिम यादी तयार झाली असून १५ फेब्रुवारीला या अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 

 

13 Feb 2025, 07:35 वाजता

राजन साळवींचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश

 

Rajan Salvi : एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय शिवसेना UBT पक्षाचे राजन साळवी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. ब-याच दिवसांपासून त्यांच्या या पक्षप्रवेशाची चर्चा रंगत होती..अखेर काल त्यांनी शिवसेना UBT पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. अनिल देसाई यांच्यामार्फत शिवसेना UBT पक्षाच्या उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राजन साळवी अखेर मशाल सोडून आता हाती धनुष्यबाण घेणार आहेत.  ठाण्यात आज दुपारी साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील...

बातमीचा व्हिडीओ पाहा -