Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 13, 2025, 22:40 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

13 Feb 2025, 13:46 वाजता

राज्याची लूट करणा-यांचं कौतुक करणार नाही- ठाकरे

 

Delhi Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंच्या सत्कारापेक्षा एकनाथ शिंदेंचं शरद पवारांनी केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलंय. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांना भेटले पण त्यांचं कधी कौतुक केलं नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शरद पवारांना लगावलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानं त्यावरून ठाकरेंचा शरद पवारांवरील राग कायम असल्याचं दिसतंय.. कारण संजय राऊतांनी घेतलेली भूमिका अधिकृत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.. पक्ष फोडणाऱ्यांचा कौतुक कधीच होणार नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.. आम्हीही सत्ताधा-यांना  भेटलो पण त्यांचं कौतुक केलं नसल्याचंही आदित्य ठाकरे म्हणालेत.. तर दुसरीकडे संजय राऊतांनीही एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून पुन्हा टीका केलीय.. 

13 Feb 2025, 13:08 वाजता

किरण सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

 

Kiran Samant : एकीकडे आज राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.. तर दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.. त्यामुळे किरण सामंत आणि राज ठाकरे भेटीत काय गूढ हे आत्ता कळलं नसलं तरी ही वयक्तिक कारणासाठी भेट घेतल्याचे ते सांगत आहेत. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातही या भेटीत चर्चा झाल्याची माहिती समोर योतीये....

13 Feb 2025, 12:24 वाजता

कोल्हापूर-रोहा बसवर अज्ञातांकडून दगडफेक

 

Kolhapur : कोल्हापूर - रोहा बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. कराड- चिपळूण मार्गावर काल रात्री घडली घटना... दगडफेकीमुळे बसच्या काचा फुटल्या. कराडजवळ आरटीओ कार्यालयासमोर  हा प्रकार घडला आहे. ही बस कराडहून चिपळूण मार्गे रोह्याला जात असताना ही दगडफेक झाली .पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून दगडफेक कोणी आणि का केली हे मात्र समजू शकलेलं नाही. या घटनेचा तपास पोलिस करतायत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Feb 2025, 12:22 वाजता

सांगलीत फूड गोदामाला भीषण आग

 

Sangli Fire : सांगलीच्या पेठनाक येथील एका आदिती फुड्सच्या गोडावून भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत कोट्यावधीचा तयार माल जळून खाक झाला आहे,आज सकाळच्या सुमारास ही आग लागली.काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले होते,त्यामुळे आकाशात धुरांचे लोळ उठले होते.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.आगीची माहिती मिळताच आसपासच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या, पाच ते सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर भीषण आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचा तयार झालेल्या खाद्यपदार्थ व साहित्य जळून खाक झाले आहे.

13 Feb 2025, 12:19 वाजता

दाक्षिणात्य स्टार चिरंजीवी यांचं वादग्रस्त विधान

 

Chiranjivi Statement :दाक्षिणात्य स्टार चिरंजीवीनं वादग्रस्त विधान केलंय. चिरंजीवीनं त्याच्या नातवाबाबत केलेल्या विधानामुळे चाहते नाराज झालेत. आपला वारसा पुढे नेऊ शकेल असा नातू असावा अशी इच्छा जाहीररित्या त्यानं बोलून दाखवली. त्याच्या या विधानामुळे चाहते नाराज झालेत.. चिरंजीवीचा मुलगा राम चरण आणि सून उपासना यांना एक मुलगी आहे.. त्यामुळे वारसा पुढे नेऊ  शकेल असा नातू असावा असं विधान चिरंजीवीनं केलंय... त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे...

 

13 Feb 2025, 12:08 वाजता

महादेव मुंडे खूनप्रकरण तपासासाठी विशेष पथक-सूत्र

 

Beed Mahadev Munde : महादेव मुंडे खून प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या तपास पथकामध्ये 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्टेबल्सचा समावेश असणार आहे.. मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधिकक्षांची भेट घेऊन महादेव मुडेंच्या खुनाचा तपास CIDकडे द्यावा किंवा SITस्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी 5 जणांची टीम तयार करण्यात आलीये. यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह ४ कॉन्स्टेबल्सचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Feb 2025, 11:13 वाजता

अभिनेत्री उर्मिला कोठारेंची हायकोर्टात धाव

 

Urmila Kothare In High Court : भीषण कार अपघाताबाबत अभिनेत्री उर्मिला कोठारेनं हायकोर्टात धाव घेतलीये.. डिसेंबर महिन्यात झालेल्या या अपघाताचा तपास सीआयडी किंवा SITकडे सोपवण्यात यावा अशी मागणी तिने या याचिकेतून केलीये... मुंबई पोलीस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याची तक्रारही तिने याचिकेतून केलीये.. 28 डिसेंबरला अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात मेट्रोचं काम करणा-या एका मजुराचा मृत्यू झाला होता.. तर तिचा ड्रायव्हर आणि एक कामगार हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात उर्मिलाच्या कारचाही चक्काचूर झाला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Feb 2025, 11:00 वाजता

50 रुपयांच्या लवकरच नव्या नोटा येणार

 

50 Rupees New Note : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रांची स्वाक्षरी असलेली ५० रुपयांची नवी नोट जारी करणारेत. या नोटा महात्मा गांधींचं छायाचित्र असलेल्या नव्या मालिकेतील नोटांप्रमाणेच असून पूर्वी जारी केलेल्या ५० रुपयांच्या सर्व नोटा वैध ठरणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Feb 2025, 09:52 वाजता

मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल

 

MNS : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल केले जाणार आहेत.. याच महिन्यात मनसे पदाधिका-यांची बैठक होऊन पदाधिका-यांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत.. तसंच या बैठकीमध्ये मनसेची आचारसंहिताही ठरवली जाणार आहे.. वरळीतील मेळाव्यात राज ठाकरेंनी या फेरबदलाचे संकेत दिले होते.. 

13 Feb 2025, 09:45 वाजता

मुंबईत 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

 

Mumbai MD Drugs Seized : मुंबईत 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. घाटकोपर,  साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केलीये. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलीये. त्यांच्याकडून 5 किलो 535 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. मुंबईत सापडलेलं हे ड्रग्ज उत्तर प्रदेशातून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आलीये. उत्तर प्रदेशातील शिवलार चौराह या गावात हे ड्रग्ज तयार केलं जात होतं.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -