13 Feb 2025, 22:38 वाजता
राजकारणात एकमेकांना अडवा, जिरवा सुरू- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या कार्यक्रमातून सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय ...राजकारणात पाणी अडवा पाणी जिरवा असं म्हणतो मात्र आता राजकारणात एकमेकांना आडवा आणि जिरवा असंच काम सुरू असल्याचं फडणवीस म्हणालेत.. मुंबईत जलसंधारण अधिका-यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला यावेळी फडणवीस बोलत होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Feb 2025, 20:24 वाजता
मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला
Dhananjay Munde meets Ajit Pawar : धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला...अजितदादांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर दाखल...भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट...निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा मुंडेंवर आरोप...संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात
13 Feb 2025, 19:41 वाजता
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
Manipur Politics : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलंय..मणिपूर CMच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलंय... केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू
13 Feb 2025, 19:04 वाजता
हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड
Harshvardhan Sapkal : झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब...हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष..विजय वडेट्टीवार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी
13 Feb 2025, 18:04 वाजता
मी आदित्य ठाकरेंसोबत,कुठेही जाणार नाही- संजय दिना पाटील
Sanjay Dina Patil : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते. त्यावरून संजय दिना पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.. त्यानंतर आता संजय दिना पाटील यांनी यांनी या चर्चांना उत्तर दिलंय.. सुरू असलेल्या चर्चा खोट्या असल्यांचं त्यांनी म्हटलंयय... आदित्य ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय..
13 Feb 2025, 17:31 वाजता
चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Chandrashekhar Bawankule : भाजपाच्या 'संघटन पर्व' अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र दौरा करणारेत. आजपासून १५ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांचा त्यांचा हा दौरा असणारेय. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणही असणारेत. राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणारेत. अकोला, नागपूर, नांदेड, संभाजीनगर, जळगाव, नाशिक
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Feb 2025, 16:39 वाजता
महिला व बालविकास विभागात मेगाभरती
Women and Child Development Department Recruitment : महिला व बालविकास विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे.. विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली..शासनाने विविध विभागात 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय... महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत तब्बल 18 हजार 882 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरतीप्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अंगणवाडी सेविकेत 5 हजार 639 तर मदतनीस विभागात 13 हजार 243 अशी एकूण 18 हजार 882 पदे भरण्यात येणार आहे.
13 Feb 2025, 16:03 वाजता
राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश
Rajan Salvi : राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश..एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश..राजन साळवी यांच्या हाती धनुष्यबाण.
13 Feb 2025, 15:36 वाजता
महाकुंभमेळ्यात 4 वर्ल्ड रेकॉर्ड होणार
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात चार नवे वर्ल्डरेकॉर्ड होणार आहेत... पहिल्या दिवशी 15 हजार सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार आहेत... दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला 300 कामगार नदीत उतरून स्वच्छता करतील...16 फेब्रुवारीला त्रिवेणी मार्गावर 1 हजार ई-रिक्षा धावणार आहेत. तर 17 फेब्रुवारीला 10 हजार लोकांच्या हाताचे ठसे घेण्याचा विक्रमही केला जाणार आहे. या सर्व विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.. त्यासाठी गिनीज बुकची टीम संगम घाटावर दाखल होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Feb 2025, 14:59 वाजता
मुंबईत 140 कोटींची GST चोरी
Mumbai GST : मुंबईत 140 कोटींची GSTचोरी झाल्याचं उघडकीस आलंय.. बनावट GST देयकांच्या आधारे ही चोरी सुरु होती.. या प्रकरणी मिरा रोड येथून कपाडिया मोहम्मद सुल्तान या आरोपीला अटक करण्यात आलीये.. या प्रकरणी सुरुवातीला 26.92 कोटी रुपयांची चोरी समोर आली होती. त्यासंबंधी अधिक तपास केला असता मुख्य आरोपी सुल्तान हा 18 बनावट कंपन्यांच्या नावे देयके तयार करुन GSTचा परतावा घेत असल्याचे दिसून आले. अशा बनावट परताव्यांचा आकडा 140 कोटी रुपये होता. या घोटाळ्यासाठी सुल्तानने आधार कार्ड, पॅनकार्डसह अन्य दस्तावेजांचा गैरवापर केला होता. हे कार्ड विविध व्यक्तींच्या नावे होते. त्यांच्या नावे बनावट कंपन्या उघडून जीएसटीचा परतावा स्वतःच्या खात्यात घेतला जात होता.. त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीये..