WHO ने मीठ खाण्याबाबत नवीन सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी, सामान्य मिठाऐवजी कमी सोडियम आणि जास्त पोटॅशियमयुक्त पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात. अशुद्ध मीठ खाण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड कमी खावे, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असतो.
अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार, सामान्य मिठाऐवजी कमी सोडियम आणि अधिक पोटॅशियम असलेले मीठ खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. विशेषतः ज्या लोकांना पूर्वी हृदयाचा झटका आला आहे, त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी पॅकेटमधील भेसळ केलेले मीठ जेवणात वापरू नये.
WHOच्या अहवालानुसार, जगभरातील बहुतांश लोक दररोज 10.8 ग्रॅम मीठ खातात, जे आवश्यकतेपेक्षा खूप जास्त आहे. जर ही सवय बदलली नाही, तर येत्या 5-6 वर्षांत सुमारे 70 लाख लोक फक्त जास्त मीठ सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यूमुखी पडू शकतात.
मीठाचे एक दोन नाही तर अनेक प्रकार आहेत. जसे की सैंधव मीठ, पादेलोण, समुद्री मीठ, बीडलवण, सांबारलोण हे सोडियम कमी प्रमाणात असणारे मीठाचे प्रकार आहेत.
हे ही वाचा: प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असतं का? काय सांगतात तज्ज्ञ, पाहा
रक्तदाबाची समस्या असलेल्या किंवा नसलेल्या सगळ्यांनीच पॅकेटमधील बारीक मीठ वापरण्याऐवजी या पर्यायांचा अवलंब करावा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)