सलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ

This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यात वाद असणं यात काही नवीन नाही. हे अभिनेते, अभिनेत्री कधीच एकत्र काम करत नाहीत. दरम्यान इंडस्ट्रीत एक असा अभिनेता आहे ज्याचं गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबाशी वैर आहे. हा अभिनेता कधीच बच्चन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसह काम करत नाही.   

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 08:10 PM IST
सलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ

This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूड म्हटलं की येथे स्पर्धा, मैत्री, शत्रुत्व सगळं काही असतं. कधी एखाद्या काळी एकमेकांची जिवलग म्हणवून घेणारे मित्र आज एकमेकांचे कट्टर शत्रूही आहेत. हे शत्रुत्व कधी कधी एकमेकांचं तोंडही न पाहण्यापर्यंत असतं. तर कधी तरी अजय देवगण आणि शाहरुख खानप्रमाणे हे शत्रुत्व विसरुन पुन्हा मैत्रीही केली जाते. बॉलिवूडमधील या शत्रुत्व असणाऱ्यांच्या यादीत सनी देओल आणि बच्चन कुटुंबही आहे. हे वैर इतक्या टोकापर्यंत आहे की मागील 30 वर्षात त्यांनी एकत्र काम केलेलं नाही. कधी काळी एका चित्रपटात सनी देओल आणि अमिताभ यांनी एकत्र काम केलं होतं. पण नंतर ते एकत्र दिसले नाहीत. 

बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांचं नाव घेतलं जातं तेव्हा अनेकांना सलमान खान किंवा विवेक ओबेरॉय यांच्याशीच शत्रुत्व असावं असं वाटतं. सलमान आणि विवेक दोघांनीही ऐश्वर्या आणि अमिताभ यांच्यासोब काम केलं आहे. सलमानने ऐश्वर्या रायसोबत 'हम दिल दे चुके सनम'मध्ये काम केलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बागवान' चित्रपटातही त्याने छोटी भूमिका साकारली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. 

सनी देओल आणि बच्चन कुटुंबातील वैर फार टोकाचं असून, गेल्या 30 वर्षांपासून त्यांच्यात कोणताही संवाद नाही. 30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये आलेल्या 'इन्सानियत' चित्रपटात सनी आणि अमिताभ एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. या चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आपला जिवलग मित्र धर्मेंद्रचा मुलगा असल्याने अमिताभ बच्चन यांचे सनी देओलवर स्वतःच्या मुलासारखे प्रेम होतं, असं म्हटले जाते, पण सनीच्या नव्या ओळखीबद्दल ते थोडेसे चिंतेत होते.  

अमिताभ बच्चन सनी देओलच्या नव्या स्टारडमबद्दल थोडे घाबरू लागले होते आणि त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर वातावरणात काही बदल झाले होते. IMDB च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यात अनेक गैरसमज झाले. अमिताभ सनीला आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानू लागले होते. 

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अमिताभ यांची भूमिका छोटी होती, मात्र नंतर ती मोठी करण्यात आली. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनीला दुर्लक्षित करत अमिताभ यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात आलं होतं.   या सर्व घडामोडींनंतर सनी देओलने अमिताभ यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली. याशिवाय अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे बच्चन कुटुंब आणि सनी देओलमधील अंतर वाढत गेलं.   

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बॉर्डर' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी सनी देओलला आणखी एक चित्रपट बनवण्याचं आश्वासन दिलं होते. पण जेव्हा त्याने 'LOC: कारगिल' हा सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी सनी देओलच्या जागी अभिषेक बच्चनला सिनेमात घेतले. यामुळे सनी जेपी दत्ता यांच्यावर रागावला आणि अभिषेकपासूनही दूर राहू लागला.  इतकंच नाही तर सनी देओलने बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबत एका चित्रपटातही काम केलं होतं. पण तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. 1997 मध्ये सनी देओल आणि ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदा 'इंडियन' चित्रपटात एकत्र दिसणार होते, पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांनीही या चित्रपटासाठी गाणी शूट केली होती. यानंतर ऐश्वर्याने सनीसोबत काम करण्यास नकार दिला. यावर सनीला राग आला आणि त्याने ऐश्वर्याला फटकारले आणि तिनेही तिच्यापासून अंतर ठेवले.