Poonam Pandey Viral Video : अभिनेत्री पूनम पांडे ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळते. आता सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिचा एक चाहता तिला किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक सोशल मीडियावर काही लोक पूनम पांडेला ट्रोल करत आहेत. तर काही तिची बाजू घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी या व्हिडीओला स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं.
पूनम पांडेचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की पूनम पांडेनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तेव्हा एक व्यक्ती तिच्या मागून येते. त्याला अचानक येताना पाहून पूनमला थोडं आश्चर्य होतं. त्यानंतर ती व्यक्ती खिशातून फोन काढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. सेल्फी घेण्याआधी तू पूनम पांडेच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करतो. पूनम पांडे या व्याक्तीला मागे टाकून पुढे निघून जाते. त्यानंतर एका व्यक्तीनं त्या चाहत्याला मागे ढकललं.
पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला स्क्रिप्टेड म्हटलं आहे. पूनम पांडे ही लाइमलाइटमध्ये काहीच करून शकत नाही. एका दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की '50 रुपये काट ओवरएक्टिंग के.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आधी कॅन्सर झाल्याचं खोटं नाटक आणि आता हे. सगळ्या गोष्टीची हद्दच झाली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'लोकप्रियता मिळवण्यासाठी हे लोक काहीही करायला लागलेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'स्क्रिप्टेड आहे फार वाईट अभिनय केलाय.'
हेही वाचा : 'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...
दरम्यान, गेल्या वर्षी पूनम पांडेनं Cervical कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी खोटी अफवा पसरवली होती की तिला हा कॅन्सर झाला आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत Cervical कॅन्सरनं तिचं निधन झाल्याचं तिच्याच पेजवरून तिच्या टीमनं सांगितलं होतं. त्यानंतर पूनम पांडेनं सांगितलं की जागरुकता पसरवण्यासाठी तिनं असं केलं होतं. पूनम पांडेनं केलेल्या या कृत्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला ट्रोल केलं होतं.