Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: एक समाज जो चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनामुळे तसंच कथितपणे जेसीबीने मृतदेह हाताळले त्याऐवजी 500 वर्षांपूर्वीच्या हिंदूंच्या फिल्मी आणि अर्धवट काल्पनिक छळामुळे अधिक संतप्त झाला असेल तर तो मनाने आणि आत्म्याने मेला आहे असं विधान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केलं होतं. स्वरा भास्करने अप्रत्यक्षपणे छावा चित्रपटावर निशाणा साधल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर अखेर स्वरा भास्करने नवी पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.
"माझ्या ट्विटमुळे बरीच चर्चा आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी वारशाचा आणि योगदानाचा मी निःसंशयपणे आदर करते, विशेषतः सामाजिक न्याय आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या आदराच्या कल्पनांचा," असं स्वरा भास्करने म्हटलं आहे. माझा मर्यादित मुद्दा असा आहे की आपल्या इतिहासाचे गौरव करणं हे उत्तम आहे, परंतु कृपया वर्तमान काळातील चुका आणि अपयश लपवण्यासाठी भूतकाळाच्या वैभवाचा गैरवापर करू नका असं स्पष्टीकरण तिने दिलं आहे.
"इतिहासाचा वापर नेहमीच लोकांना एकत्र करण्यासाठी केला पाहिजे, सध्याच्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी नाही. जर माझ्या आधीच्या पोस्टमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला खंत आहे," असंही ती म्हणाली आहे. पुढे तिने म्हटलं आहे की, "इतर कोणत्याही अभिमानी भारतीयांप्रमाणे मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. आपला इतिहास आपल्याला एकत्र करेल आणि चांगल्या आणि अधिक समावेशक भविष्यासाठी लढण्यासाठी आपल्याला शक्ती देईल".
My tweet has generated much debate & avoidable misunderstanding. Without any doubt I respect the brave legacy and contribution of Chhatrapati Shivaji Maharaj.. especially his ideas of social justice & respect for women.
My limited point is that glorifying our history is great… https://t.co/YKk1QgiQRG— Swara Bhasker (@ReallySwara) February 21, 2025
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या विकिपीडियाच्या जवळपास 4 संपादकांविरोधात महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीला 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवूनही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असणारी माहिती काढली नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशन, जे मोफत ऑनलाइन माहिती पुरवतात त्यांना संभाजी महाराजांवरील मजकूर काढून टाकण्याची विनंती करणाऱ्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर फक्त स्वयंचलित उत्तर मिळालं आहे, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
छावा' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण लवकरच छावा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होऊ शकतो, तसे संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा" चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.