Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 17, 2025, 22:45 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

17 Feb 2025, 08:27 वाजता

'एक राज्य, एक नोंदणी' योजना सुरू

 

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘एक राज्य, एक नोंदणी’ ही योजना आजपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात येणार आहे... महिनाभरात सबंध राज्यभर ही योजना लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा विचार आहे. सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयांमध्ये केली जाते. अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुस-या जिल्ह्यात जमीन, घर खरेदीचे व्यवहार करतात. अशांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक राज्य एक नोंदणी योजना सुरु केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Feb 2025, 08:24 वाजता

लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री

 

Latur Liquor : लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. यामध्ये तब्बल 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत ४८ जणांना अटक केली असून ५१ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हि कार्यवाही लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभागात करण्यात आली आहे. लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर , औसा तालुक्यात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी, अवैध देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानंतर विविध पथके तयार करून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Feb 2025, 08:23 वाजता

कृष्णा आंधळे 68 दिवसांनंतरही सापडेना

 

Beed Krushna Andhale : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही.. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Feb 2025, 08:10 वाजता

साताऱ्यात राष्ट्रवादी SP पक्षाला धक्का

 

Satara : साता-यातील कोरेगाव मतदारसंघातील निगडी गावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय.. आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.त्यामुळे तब्बल 30 वर्षानंतर निगडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी झालेल्या या प्रवेशांमुळे शशिकांत शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

17 Feb 2025, 07:42 वाजता

मुंबईत भट्टीवरील तंदुर रोटी होणार बंद

 

Mumbai : मुंबईत यापुढे कोळसाभट्टीवरील तंदूर रोटी बंद होणार आहे... कोळसा तंदूर भट्टी बंद करण्याच्या नोटीसा मुंबई महानगर पालिकेनं सर्व हॉटेल्स,रेस्टॉरंट तसंच ढाब्यांना दिल्यात.. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना बीएमसीनं दिल्यात.. हॉटेलचालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीसमधून देण्यात आलाय... मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. 

17 Feb 2025, 07:41 वाजता

राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली

 

Delhi : राजधानी दिल्ली भूकंपाने हादरलीय...पहाटे साडेपाच वाजता दिल्लीत 4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.... दिल्लीतील  नांगलोई जाट भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे... दिल्लीसह आगरा, मथुरा, हरियाणापर्यंतचा भूकंपाने हादरलाय...