Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 17, 2025, 22:45 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

17 Feb 2025, 22:04 वाजता

केवळ तुतारी फुंकून पाणी येत नाही- राधाकृष्ण विखे पाटील

 

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : केवळ तुतारी फुंकून पाणी येत नाही... त्यासाठी काम करावं लागतं-विखे पाटील...राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका... राज्याचे मुख्यमंत्री काम करतायेत-विखे पाटील

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 20:17 वाजता

हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात

 

Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोर्टाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले होते. वॉरंट निघूनही ते कोर्टात हजर राहत नव्हते. त्यानंतर कोर्टानं अखेर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. आज ते कोर्टात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना सध्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे.

17 Feb 2025, 19:36 वाजता

'GBS वाढला तर यात्रांवर निर्बंध',केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधवांचे संकेत

 

Prataprao Jadhav on GBS : राज्यात जीबीएसचा प्रभाव वाढला तर यात्रांवर निर्बंध आणावे लागतील असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय.. राज्यात जीबीएसचां धोका वाढतोय.. हा रोगसंसर्ग जन्य रोग असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून आगामी काळात मोठ्या यात्रांच्या बाबतीत अधिकाऱ्यांसोबत बसून पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 19:16 वाजता

सुरक्षेत कपात केल्यानं शिवसेना आमदार नाराज-सूत्र

 

Shivsena : सुरक्षा मध्ये कपात केल्या कारणाने शिवसेना शिंदेंचे आमदार नाराज.. सूत्रांची झी २४ तासला माहिती.. शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने आमदार नाराज..शिवसेनेचा अनेक आमदारांसोबत आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार...मात्र मंत्र्यांचे वाय प्लस दर्जाचे सुरक्षा तशीच राहणार.. सूत्रांची झी २४ तासला माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 18:27 वाजता

कर्जतमध्ये 26 मार्चला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन

 

Maharashtra Kesari Kusti : कर्जतमध्ये 26 मार्चला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन...कर्जत जामखेड मतदारसंघात स्पर्धेचं आयोजन...महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून आयोजन...26 ते 30 मार्चदरम्यान होणार कुस्ती स्पर्धा...आमदार रोहित पवारांची माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 18:18 वाजता

19 फेब्रुवारीला शिवसेनेचे सर्व खासदार महाकुंभमेळात जाणार

 

ShivSena's MP Prayagraj Tour : शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराज च्या दौऱ्यावर जाणार...19 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार महाकुंभमेळात जाणार..खासदारांकडून कुंभ स्नान केले जाणार 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

17 Feb 2025, 17:54 वाजता

'उत्पादन विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही', IFFCO कंपनीचं दमानियांना स्पष्टीकरण

 

IFFCO  on Anjali Damania : ऑनलाईन ऑर्डर केलेलं नॅनो युरिया आणि नॅनो DAP च्या उत्पादनाची डिलिवरी थांबवली.. असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता..याला IFFCO कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे... कंपनीने उत्पादन विकण्याचा अधिकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नसल्याचा IFFCO कंपनीने म्हटलंय...या अनधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून केलेल्या खरेदी पूर्णतः खरेदीदाराच्या स्वतःच्या जोखमीवर आणि जबाबदारीवर आहेत. हे प्लॅटफॉर्म खरेदीदारांना फसवतात, गैरवाजवी किंमत आकारतात.. आणि रद्द झालेली उत्पादने विकतात.. असही स्पष्टीकरण IFFCO कंपनीकडून अंजली दमानिया यांना देण्यात आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 17:21 वाजता

सुप्रिया सुळे उद्या मस्साजोग दौऱ्यावर

 

Supriya Sule : सुप्रिया सुळे उद्या मस्साजोग दौ-यावर जाणार आहेत.. या दौ-यादरम्यान त्या धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.. त्यानंतर त्या परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेणार आहेत.. हेलिकॉप्टरनं सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये जाणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 16:40 वाजता

स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर

 

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार अॅक्शन मोडवर...पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित 28 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या आमदार, खासदार आणि पदाधिका-यांची मुंबईत बैठक होणार आहे..
विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, आता आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज झालीये...या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असून तसेच राज्यातील प्रश्नांसंदर्भात शरद पवार पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Feb 2025, 16:13 वाजता

मला कोणतीही ऑफर नाही- अंबादास दानवे

 

Ambadas Danve : मला कोणतीही ऑफर नाही- अंबादास दानवे...ठाकरेंसोबतच राहणार- अंबादास दानवे...'ऑफर देण्याची कुणाचीही हिम्मत नाही'... भास्कर जाधव नाराज नाहीत- दानवे...भास्कर जाधव रोकठोख भूमिका मांडतात-दानवे

बातमीचा व्हिडीओ पाहा-