Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Diksha Patil | Feb 22, 2025, 21:14 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर 

22 Feb 2025, 12:31 वाजता

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांकडून गळ्यात भगवा ! 

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांकडून गळ्यात भगवा असलेल्या फोटोसह 'शाह का रुतबा' गाण्याचं स्टेटस... धंगेकरांच्या स्टेटसची पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा... 

22 Feb 2025, 12:17 वाजता

मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का? 

नरेंद्र राणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती...नरेंद्र राणे तटकरेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले...

22 Feb 2025, 10:05 वाजता

सुरेश धस मस्साजोगमध्ये; काय बोलणार याकडे लक्ष

यावेळी सुरेश धस म्हणाले की पंकज कुमावत यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नेमा. 8 मागण्या मान्य केल्यास उपोषणाची गरज नाही. त्याशिवाय तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. तर जेल प्रशासनाला 13 मागण्या केल्या आहेत. पोलिसातील अनेक जण आरोपींना मदत करत आहेत. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना कधी अटक होणार? देशमुखप्रकरणी 10 व्या आरोपीला 302 खाली अटक करा. 

22 Feb 2025, 10:04 वाजता

सकाळीच उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला 

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला आलेत... राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उदय सामंत आलेत...

22 Feb 2025, 10:03 वाजता

पुण्यातील जागेवरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता 

पुण्यातील जागेवरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे . त्यासंदर्भातली.... शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेला भूखंड खाजगी विकसकाला देण्याच्या निर्णयावरून शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या काळातील हा निर्णय झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय.

22 Feb 2025, 09:54 वाजता

संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम 40 वर्षांपासून रखडलंय

संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलंय. 1986 साली भूमिपूजन झालेल्या स्मारकाचं काम वर्षानुवर्ष रखडलं. उद्घाटनावेळी राजकीय नेत्यांनी भव्यदिव्य स्मारक उभारण्याचं स्वप्नं दाखवलं. पण ते स्मारक पूर्ण कधी झालंच नाही. 80 लाख खर्च करुनही शंभूराजांचं स्मारक अपूर्णच आहे.

 

22 Feb 2025, 09:53 वाजता

गंगाजलच्या शुद्धतेवर शास्त्रज्ञ अजयकुमार सोनकर यांचा दावा

गंगाजल केवळ आंघोळीसाठी योग्य नाही तर ते क्षारीय पाण्याइतकंच शुद्ध, संगमाच्या पाण्याच्या शुद्धतेवरील प्रश्नांवर शास्त्रज्ञ अजयकुमार सोनकर यांचा दावा...

 

22 Feb 2025, 09:50 वाजता

महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा पुढे...

येत्या 24 फेब्रुवारीपासून 12 मार्चपर्यंत उत्तर प्रदेशात 10वी आणि 12वीची परीक्षा होणार... महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये 24 फेब्रुवारीचा पेपर 9 मार्चला होणार.. 

 

22 Feb 2025, 09:44 वाजता

उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्राच्या दौऱ्यावर...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रमाला उपस्थित राहणार.  त्यांच्यासोबत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनही उपस्थित राहणार