Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Diksha Patil | Feb 22, 2025, 21:14 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर 

22 Feb 2025, 21:12 वाजता

कर्नाटक राज्यात जाणा-या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. प्रवासी, कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी निर्णय.

22 Feb 2025, 19:34 वाजता

98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात वेळेअनुसार प्रोग्राम ना झाल्याने गोंधळ झाला.  निमंत्रितांचं कवी संमेलन सत्रातील कवी संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी व्यासपीठ सोडलं.  नाईलाज होतं म्हणून सोडून यावा लागलं. निमंत्रितांचं कवी संमेलन हा कार्यक्रम ही लांबल्याने भालेराव यांनी व्यासपीठ सोडलं. व्यासपीठावरील कवी आणि भालेराव यांच्यामध्ये कार्यक्रम सुरू ठेवण्यावरून मतभेद.

22 Feb 2025, 18:36 वाजता

कर्नाटकामध्ये मराठी बसचालकाला झालेली मारहाण तसेच बसला काळ फासण्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसेस रोखल्या आणि त्यावर काळ फासल. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यादरम्यान त्यांच्यात झटापट देखील झाली. महाराष्ट्र सरकारने या विषयात लक्ष घालावं अन्यथा कन्नडीगांच्या अन्यायाविरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

22 Feb 2025, 17:48 वाजता

छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्ट्रीय विमानतळ समोरील 5 स्टार हॉटेलला भीषण आग लागली आहे. अग्निसमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. 

22 Feb 2025, 16:51 वाजता

काँग्रेसच्या 2 आमदारांसह अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. 

22 Feb 2025, 16:04 वाजता

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार...

22 Feb 2025, 14:34 वाजता

नवनीत राणा यांना ओवेसी यांनी न्यायालया मार्फत दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी नवनीत राणा हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार. असदुद्दीन ओवेसी यांच्या बद्दल नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

22 Feb 2025, 13:56 वाजता

तारकर्लीमध्ये दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू 

मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले, त्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू. स्थानिकांनी पाच पर्यटकांपैकी तिघांना वाचवलं तर दोघांचा बुडून मृत्यू. दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले. 
खोल समुद्रात जाऊ नये अस स्थानिकांनी सागून देखील पर्यटक खोल समुद्रात गेल्याने दुर्घटना घडली. प्रशासनाचा मात्र अश्या घटनाकडे दुर्लक्ष

22 Feb 2025, 13:09 वाजता

मुंबईत इमारतीला भीषण आग

- मरीन लाईन्स येथे इमारतीला आग
-पाचव्या मजल्यावर लागली आग
-आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

22 Feb 2025, 13:04 वाजता

कर्नाटकात एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण 

कर्नाटकात एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण झाली होती. त्या मारहाणीचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले. कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटी बसगाड्या अडवल्या आणि त्या गाड्यांवर भगवे ध्वज लावले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कर्नाटक सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, यावर राहुल नार्वेकरांनीही प्रतिक्रिया दिलीय ही घटना खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय