'छावा' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाने 116 कोटी रुपये कमावून खळबळ उडवून दिली. चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांना भावूक करतो. अलीकडेच, अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये 'छावा'ला पाहून एक लहान मुलगा भावूक झाल्याच दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मुलगा हृदयावर हात ठेवून रडताना दिसत आहे.
विक्की कौशलने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "आमची सर्वात मोठी कमाई! तुझा अभिमान आहे बेटा... मला तुला मिठी मारता आली असती तर बरे होईल. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. शंभू राजेंची कहाणी जगातील प्रत्येक घरात पोहोचावी अशी आमची इच्छा होती... आणि हे घडताना पाहणे हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. चित्रपटगृहात छावा."
या व्हिडिओपूर्वी विकी कौशलने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये काही लोक चित्रपटाच्या पोस्टरवर दूध ओतत होते आणि "छत्रपती संभाजी महाराज की जय" च्या घोषणा देत होते. छत्रपती संभाजी महाराजांना देवाप्रमाणे पूजणारी लोकं आहेत. अशा पद्धतीने संभाजी महाराजांची पूजा केली आहे.
'छावा'ने पहिल्या आठवड्यात 116 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाची सुरुवात ₹31 कोटींच्या कलेक्शनने झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ₹ 37 कोटींची कमाई केली. रविवारी त्याच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि त्याने 48.50 कोटी रुपये कमावले. आता त्याची खरी परीक्षा सोमवारी होईल. त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लोकांना 'छावा' खूप आवडत आहे, प्रेक्षकांनी शेवटच्या 45 मिनिटांचे अतिशय कौतुक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्रात, चाहते सिनेमागृहाबाहेर विक्कीच्या कटआउटवर दूध ओतून आनंद साजरा करत आहेत. छावाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.