सिने वर्कर्सच्या मदतीला धावला विजय सेतुपती; दान केले 1.30 कोटी

Vijay Sethupathi : विजय सेतुपतीनं सिने वर्कर्सच्या मदतीसाठी पुढे केला हात... केली तब्बल 1.30  कोटींची मदत

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2025, 02:25 PM IST
सिने वर्कर्सच्या मदतीला धावला विजय सेतुपती; दान केले 1.30  कोटी
(Photo Credit : Social Media)

Vijay Sethupathi : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीच्या लोकप्रियतेविषयी काहीही सांगण्याची गरज नाहीये. त्याचे फक्त भारतात नाही तर परदेशातही त्याचे लाखो चाहते आहेत. विजय सेतुपती हा फक्त ऑन स्क्रिन नाही तर खऱ्या आयुष्यात देखील एक स्टार आहे. विजय सेतुपतीनं चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी घर बांधण्यासाठी 1 कोटी दान केले आहेत. हे घरं त्या लोकांसाठी असणार आहे ज्यानी चेन्नईईच्या फिल्म एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ साउथ इंडियामध्ये (FEFSI) योगदान केलं. त्याचा एकच हेतू आहे की टेक्नीशियन्स आणि रोजंदारावर काम करणाऱ्यांना राहण्यासाठी एक चांगलं घर मिळावं त्यासाठी हे सगळं करण्यात आलं आहे. 

ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ही माहिती दिली की विजय सेतुपतीनं एक अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या निर्मितीसाठी 1.30 कोटींचं दान केलं आहे. या कॉम्प्लेक्सचं नाव त्यांच्याच सन्मानार्थ त्याचच देण्यात येणार आहे. त्यांनी यात लिहिलं की "मक्कल सेल्वन विजय सेतुपतीनं घर बनवण्यासाठी #FEFSI चित्रपट कर्मचाऱ्यांच्या यूनियनला 1.30 कोटींचं दान केलं आहे. तर आता या अपार्टमेंट टॉवरला 'विजय सेतुपती टावर्स' असं नाव देण्यात येणार आहे." तर विजय सेतुपतीनं केलेल्या या कृतीचं सगळीकडून कौतूक होत आहे. 

21फेब्रुवारीला तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता उदयनिधी स्टालिन यांनी अधिकृतपणे एक नवीन आदेश (GO) दिला आहे. त्याच्या अंतर्गत FEFSI तमिळ चित्रपट निर्माता काउंसिल, साऊथ इंडियन आर्टिस्ट्स असोसिएशन आणि तमिलनाडु स्मॉल स्क्रीन आर्टिस्ट असोसिएशनसोबत प्रमुख इंडस्ट्री संघाला जमीन देण्यात आली आहे. FEFSI तमिळ फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये विविध ट्रेंड्समुळे 23 यूनियन आणि जवळपास 25,000 सदस्यांचं प्रतिनिधित्व करत आहे. 

हेही वाचा : विकी आधी कतरिनाला ऑफर झालेला 'छावा'? 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत येसूबाई म्हणून झळकली असती

दरम्यान, विजय सेतुपतीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं 2024 मध्ये तीन चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानं श्रीराम राघवनच्या 'मेरी क्रिसमस' पासून सुरुवात केली. त्यात कतरिना कैफ देखील दिसली होती. त्याशिवाय त्याचा 'महाराज' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'विदुथलाई पार्ट 2' प्रदर्शित झाला. यंदाच्या वर्षी अर्थात 2025 मध्ये विजय सेतुपती अनेक चित्रपटांसाठी तयारी करत आहे. त्यात 'गांधी टॉक्स', 'ऐस' आणि 'ट्रेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.