खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
Mar 20, 2013, 01:53 PM ISTअपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.
Mar 19, 2013, 01:57 PM ISTबाप्पाचे स्वागत `खड्डेमय रस्त्यांनी`
कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.
Sep 17, 2012, 09:39 AM ISTगणेशोत्सवासाठी जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्यांना प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि गतीशील होण्याकरिता १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांकडून शासनास पाठवण्यात आला आहे. याआधी जड वाहनांना, अशी बंदी घालण्यात आली होती.
Sep 11, 2012, 03:55 PM IST