mumbai goa highway 0

मुंबई - गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिली तंबी

येत्या 3 सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त झाला नाही तर संबधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

Aug 27, 2016, 11:09 PM IST

थर्टी फर्स्ट : मुंबई - गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जातेय. 

Dec 31, 2015, 07:04 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद

गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

Sep 9, 2015, 09:38 AM IST

राज्यात तीन अपघातात ५ ठार, ५४ जखमी

राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघात ५ ठार तर ५४ जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर दोन तर पुणे-सोलापूर मार्गावर एक अपघात झाला. 

Jun 20, 2015, 01:16 PM IST

कणकवलीत आंदोलक-पोलीस आमनेसामने, नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे भात शासनाने खरेदी न केल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज शेतकरी आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेत. तर आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण होते.

May 27, 2015, 01:57 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.

Aug 27, 2014, 10:29 AM IST

मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण - विनायक राऊत

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. येत्या २४ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

Aug 21, 2014, 04:30 PM IST

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.

Feb 11, 2014, 10:02 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गणेश उत्सवाच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे या मार्गावर जड वाहने चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

Sep 6, 2013, 03:49 PM IST

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 25, 2013, 09:10 AM IST