मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रोची दरवाढ तुर्तास टळली, मात्र...

मेट्रोची दरवाढ सध्या तरी टळली आहे, कारण ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकिट दरांत कोणतीही वाढ होणार नसल्याचं, मेट्रो दरवाढ निश्चिती समितीने स्पष्ट केलं आहे. तिकिटांत कोणतीही वाढ न झाल्याने आता मेट्रोची तिकिटं या आधी होती तशीच म्हणजे, १० रूपये, २० रूपये, ३० रूपये आणि ४० रूपये अशीच राहणार आहे.

Jul 20, 2015, 02:15 PM IST

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

Nov 20, 2014, 08:32 PM IST

मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी

 मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.

Nov 20, 2014, 06:00 PM IST

मुंबई मेट्रोने महिलांना एक गिफ्ट दिलंय

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई मेट्रोने महिलांना एक महत्वाची भेट दिलीय. लोकलप्रमाणे आता मेट्रोमध्येही महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असणार आहे. यामुळे निश्चितच महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

Aug 14, 2014, 06:16 PM IST

मुंबई मेट्रोत प्रत्येक डब्यात महिलांसाठी आरक्षित भाग

मुंबई मेट्रो मध्ये आता प्रत्येक डब्यात महिलांसाठी एक भाग आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापनानं घेतला आहे. 

Aug 14, 2014, 07:45 AM IST

मुंबई मेट्रोचे नवीन दर ९ जुलैपासून लागू

 रेल्वे भाडेवाढीमुळं खिशाला चाप बसलेल्या मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.

Jun 24, 2014, 04:41 PM IST

मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

Jun 8, 2014, 11:17 AM IST

मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढू देणार नाही - मुख्यमंत्री

मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

Jun 7, 2014, 07:48 PM IST

वर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन

वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.

Jun 7, 2014, 05:24 PM IST