Maharashtra Breaking News LIVE Updates: कर्नाळा किल्ल्यावर 40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...      

Maharashtra Breaking News LIVE Updates: कर्नाळा किल्ल्यावर 40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

 

 

 

15 Feb 2025, 19:31 वाजता

कर्नाळा किल्ल्यावर 40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर

कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 9 जण जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. संदीप पुरोहित असे मृत पर्यटकाचे नाव आहे. माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी आणि अन्य ठिकाणचे काही विद्यार्थी आणि पर्यटक असे 40 ते 50 जण ट्रेकिंगसाठी पनवेलजवळील कर्नाळा किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावर झालेल्या गोंगाटामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेय. मधमाश्यांनी हल्ला केल्याने पर्यटक  धावत सुटले आणि त्यात पडून जखमी झाले यात एका पर्यटकांचा मृत्यू झाला. 

 

15 Feb 2025, 19:30 वाजता

 सराईत रिक्षा चोराला पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश

पनवेल भागातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या एका सराईत ऑटो रिक्षा चोरट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. निसार सत्तार खान (36) असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याने पनवेल, कळंबोली आणि कामोठे भागातून रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्याकडुन तब्बल 12 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या 18 रिक्षा बुलढाणा येथून हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे सदर आरोपी हा रिक्षा चालवत असतानाच ऑटो रिक्षा हेरुन त्यांची चोरी करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

15 Feb 2025, 18:06 वाजता

 न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या जनरल मॅनेजरला घेतलं ताब्यात

 न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या जनरल मॅनेजरने बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढून त्याचा अपहार केल्याचे समोर आले होते/.  हितेश प्रविणचंद मेहता असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील करत होती. आता बँकेचा जनरल मॅनेजर हितेश प्रविणचंद मेहता याला अटक करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

15 Feb 2025, 17:28 वाजता

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होईल - मंत्री आशिष शेलार

उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे अनेक लोकं आमच्या (माझ्या) संपर्कात आहे, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पूर्वी उद्धव ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होईल असा दावा भाजप नेते आणि राज्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. 'सर्व गोष्टी उघडपणे सांगता येत नाही, मात्र, आगे आगे देखिये होता है क्या' असे सूचक वक्तव्य ही आशिष शेलार  यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक भाजपच्या संपर्कात आहे असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे, गुप्तपणे संपर्कात आहे की उघडपणे संपर्कात आहे हे आम्हाला माहीत नाही. मात्र, आता उबाठा सेना राहिली कुठे, उद्धव ठाकरे म्हणतात मी आणि माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी आहे. आणि उरलेले आमच्या संपर्कात आहे असे आशिष शेलार म्हणाले.

15 Feb 2025, 17:27 वाजता

स्व.तुकाराम बिडकर यांच्या परिवाराला आम्ही एकटं पडू देणार नाही - अजित पवार

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा दोन दिवसांपूर्वी अपघातात निधन झालं होतं. त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकोल्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबीयां सोबत अर्धा तास भेट घेतली यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. स्व.तुकाराम बिडकर यांच्या परिवाराला आम्ही एकटं पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली तर तुकाराम बिडकर यांच्यासारख्या व्यक्तीला गमावल्याचा दुःखही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

15 Feb 2025, 16:35 वाजता

धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीला 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे देण्यासाठी धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच वाल्मीक कराडच्या बी टीमवर कारवाईची करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.  त्याबरोबरच त्या चार संशयित व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी सीआयडीकडे केली. 

15 Feb 2025, 16:13 वाजता

काँग्रेस परतूरचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलियांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश 

काँग्रेसचे परतूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश झाला आहे. आज परतुर या मतदारसंघांमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  जेथलिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित केला पक्षप्रदेश केला. यामुळे परतुर मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडलं आहे. 

15 Feb 2025, 16:09 वाजता

एकही आमदार पडू देणार नाही असा शब्द मी दिला होता

एकही आमदार पडू देणार नाही असा शब्द मी दिला होता.  60 आमदार आपण निवडणून आणले. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सागा खरी शिवसेना कुणाची. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांची की वारसदारांची. आम्ही जिंकलो की मतदान यादीत, EVM मध्ये घोटाळा. पण जेव्हा ते विजयी होतात तेव्हा कोणता घोटाळा नसतो.  महाविकासआघाडीने महाराष्ट्रातील सर्व विकासकामांना ब्रेक लावला होता.  रत्नागिरीत, कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी कोयनेचे पाणी, वाहून जाणरं पाणी, समुद्राचं पाणी अडवणार.  67 tmc कोकणात थांबले पाहिजे यासाठी उपाययोजन करणार. कोकण विकास प्राणधिकरण, MIDC, MMRDA, सिडको यांच्या कोकण विकास प्राणधिकरणात समावेश आहे. यांच्या माध्यमातून कोकणचा विकास करणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले 

15 Feb 2025, 16:02 वाजता

संजय राऊत,अनिल देसाई,चंद्रकांत खैरे,विनायक राऊत,अंबादास दानवे बैठकीला पोहचले. 

15 Feb 2025, 15:44 वाजता

उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाच्या नेत्यांची बैठक, डॅमेज कंट्रोलवर होणार चर्चा 

- - विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर नेते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत 

- - आज दुपारी 4 वाजता मातोश्रीवर बैठक होणारी

- -  ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात होणारे प्रवेश पाहता डॅमेज कंट्रोल साठी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती आहे