Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांची प्रकृती बिघडली; नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर  

Mansi kshirsagar | Feb 16, 2025, 21:59 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांची प्रकृती बिघडली; नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

 

16 Feb 2025, 08:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: कल्याण ग्रामीणमध्ये अवैध मातीची रात्रभर वाहतूक केली जाते. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालीय. याप्रकरणी प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात येतेय.

16 Feb 2025, 08:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 67 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये.

16 Feb 2025, 08:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: कोंबड्यांमुळं GBSची लागण; अजित पवारांची माहिती

जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता. पण या आजाराचं संक्रमण होण्यामागील आणखी एक कारण आता समोर येत आहे. फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे अशी महिती त्यांनी दिली

16 Feb 2025, 08:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यात आणखी एका रुग्णाला GBSची लागण 

पुणे शहरात रोज जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असून रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्य कमी दिसते. आत्तापर्यंत १२४ GBS बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज नव्याने एक रुग्ण सापडला. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली असून त्यातील १८१ रूग्णांVE जीबीएसचं निदान झालंय. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळतायत

16 Feb 2025, 07:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाकुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव, अनेक तंबू जळून खाक

प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यात पुन्हा आगीची घटना घडलीये.. सेक्टर 18 आणि 19मध्ये ही भीषण आग लागलीये. या आगीमध्ये अनेक तंबू जळून खाक झालेत.. या घटेमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये  कुंभमेळ्याला देशभरातून लाखो भाविकांनी सहभाग घेतलाय. मात्र, कुंभमेळ्यात आग लागल्याच्या आतापर्यंत तीन घटना घडल्यात.

16 Feb 2025, 07:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: एमएमआरडीएकडूनअटल सेतूवर मॅरेथॉनचं आय़ोजन. मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग १३ तास बंद.

16 Feb 2025, 07:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनलमधील पंचांच्या वादग्रस्त निकालाची पडताळणी होणार. राज्य कुस्तीगीर संघाकडून 5 जणांची चौकशी समिती गठीत. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना 

16 Feb 2025, 07:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनलमधील पंचांच्या वादग्रस्त निकालाची पडताळणी होणार. राज्य कुस्तीगीर संघाकडून 5 जणांची चौकशी समिती गठीत. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना 

16 Feb 2025, 07:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख आज घेणार सीआयडी अधिका-यांची भेट. महत्त्वाचे पुरावे सीआयडीला देणार.

16 Feb 2025, 07:20 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होणार?

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार. उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार.