18 Feb 2025, 20:19 वाजता
मुंडे आणि धस भेटीनंतर संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut On Suresh Dhas : सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. सुरेश धसांवर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही.. बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल ही खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Feb 2025, 19:15 वाजता
सुरेश धस यांनी घेतली रश्मी शुक्लांची भेट
Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतलीये.. यावेळी त्यांनी बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिका-याची SITचौकशी करण्याची मागणी केलीये..निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत असून त्यांच्या आशिर्वादानं अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप धसांनी केलाय..
18 Feb 2025, 18:14 वाजता
पक्षांतराच्या चर्चांना वैभव नाईकांकडून पूर्णविराम
Vaibhav Naik : कोकणात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देत आहेत... राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केलाय.. आणि त्यानंतर वैभव नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.. मात्र,एसीबीची चौकशी एकटाच लढणार असून कुठल्याही पक्षात जाणार नाही.. उद्धव ठाकरेंसोबत राहणार, ही माझी भूमिका स्पष्ट असल्याचं वैभव नाईकांनी म्हणत पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय...
18 Feb 2025, 18:05 वाजता
रोहित पवारांचा राज्य सरकारवर आरोप
Rohit Pawar Tweet : राज्य सरकारने निधी थकवल्याने अनेक योजना ठप्प झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. महात्मा फुले जनआरोग्य ठप्प पडलीय. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. लाडकी बहीण योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप रोहित पवारांनी ट्विटरवरून केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा
18 Feb 2025, 15:59 वाजता
वाशिममध्ये आरोग्यमित्र संघटनेचं आंदोलन
Washim : वाशिममध्ये आरोग्यमित्र संघटनेनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय.. आरोग्यमित्रांना शासनाकडून वेतन व अन्य सुविधांबाबत सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरोग्यमित्र संघटनेनं दिलाय..
18 Feb 2025, 15:53 वाजता
हिंगणघाट बसस्थानक परिसरात आढळलं नवजात अर्भक
Wardha : वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या बसस्थानक परिसरात असलेल्या महिला प्रसाधनगृहात नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रसाधनगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी एका कचरापेटीत हे अर्भक आढळून आलं.महिला प्रवासी महिला प्रसाधन गृहात गेली असता तिला दुर्गंधीचा वास आला. त्यानंतर कचरा पेटीत हे नवजात अर्भक आढळलं. नेमकं हे अर्भक कुणाचं याबाबत आता पोलीस कसून चौकशी करतायत.
18 Feb 2025, 14:16 वाजता
विकिपीडियावरील शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर काढा- मुख्यमंत्री
Devendra Fadnavis on Sambhaji Maharaj : झी २४ तासच्या बातमीचा इम्पॅक्ट...विकिपीडियावरील शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर काढा तर तत्काळ कारवाई करा ...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश....
18 Feb 2025, 13:49 वाजता
राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपचं उत्पन्न सर्वाधिक
BJP : राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपचं उत्पन्न सर्वाधिक...काँग्रेसच्या उत्पन्नात तब्बल 171 टक्के वाढ...असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात माहिती...2023-24मधील भाजपचं उत्पन्न 4340 कोटी...1225 कोटींच्या उत्पन्नासह काँग्रेस दुस-या स्थानी...सर्वाधिक निधी देणग्या आणि निवडणूक रोख्यांमधून
18 Feb 2025, 13:14 वाजता
शिवसेनेचे खासदार उद्या प्रयागराजला जाणार, महाकुंभमेळ्यात खासदार गंगास्नान करणार
Shivsena : शिवसेनेचे खासदार प्रयागराजला जाणार...महाकुंभमेळ्यात खासदार गंगास्नान करणार..19 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रयागराजला जाणार असल्याची माहिती...हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न...खासदारांच्या कुंभस्नानावर राऊतांनी हल्लाबोल केलाय....तुमचं गद्दारीचं पाप धुतलं जाणार नाही- राऊत...देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या खासदारांना एक पवित्र साबण द्यावा; संजय राऊतांचा सल्ला
18 Feb 2025, 12:47 वाजता
संभाजी महाराजांबाबत बोलताना अभिनेता कमाल खान पुन्हा बरळला
Kamal Khan : संभाजी महाराजांबाबत बोलताना अभिनेता कमाल खान पुन्हा बरळला...विकिपीडियावरील संभाजी महाराजाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खाननं शेयर केलाय. विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह असून सुद्धा तोच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खानने तो शेअर केलाय. विकीपीडियावरील शंभूराजेंबाबतचा मजकूर आक्षेपार्ह असल्याची बातमी झी 24 तासनं लावून धरली तर दुसरीकडे कमाल खान तोच मजकूर खरा असल्याचं सांगतो.. त्यामुळे कमाल खानवर सरकार कारवाई करणार का?