Live Updates: छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरात प्रत्येक घडामोडींवर या बातम्यांचा लाईव्ह ब्लॉगमधून घ्या अपडेट्स.      

Live Updates: छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणासह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये अनेक घडामोडीचे संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून वेगवान अपडेट्ससह पाहा एका क्लिकवर... 

18 Feb 2025, 22:33 वाजता

विकिपीडियानं शंभूराजांबाबतचा बदनामीकारक मजकूर हटवला

झी २४ तासच्या मोहिमेला मोठं यश

शंभूराजांचा बदनामीकारक मजकूर हटवला

झी २४ तासच्या मोहिमेनंतर सरकारनं दिले कारवाईचे आदेश

विकिपीडियाला नोटीस बजावताच हटवला कंटेंट

18 Feb 2025, 20:47 वाजता

उत्तर प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. पहिल्या दिवशी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं.. दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अतुल प्रधान स्वतःला साखळ्यांनी बांधून हजर झाले होते. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांचा अपमान करण्यात आला. ते दाखवण्यासाठी, ही साखळी घातली असल्याचं अतुल प्रधान यांनी म्हटलंय..

18 Feb 2025, 20:47 वाजता

तुळजाभवानीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार सुरु असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी मंडळानं केलाय... जवळपास दीड हजार तरुण ड्रग्जच्या विळख्यात असल्याचा दावा पुजा-यांनी केलाय.. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर चार महिन्यांपूर्वी विषय घालूनही लक्ष देत नाहीत... तसंच ड्रग्ज तस्करीवर कानाडोळा करतात असा गंभीर आरोप या पुजा-य़ांनी केलाय.

18 Feb 2025, 20:45 वाजता

दिल्लीत शपथविधी सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आलाय. 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडणारय. तर उद्या दुपारी साडे तीन वाजता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणारय.

18 Feb 2025, 18:10 वाजता

नागरी सहकारी बँकांचा ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ६० नागरी सहकारी बँका नामशेष झाल्यात. २०२२-२३ मध्ये देशभरात १७ नागरी सहकारी बँका बुडाल्या. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचं दिसत असलं तरी उद्दाम बँकचालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडतेय. उलट सामान्य सभासद, ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचं चित्र आहे.

18 Feb 2025, 18:09 वाजता

छत्रपती संभाजी महाराज आक्षेपार्ह मजकूर प्रकरण, सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस

- छत्रपती संभाजी महाराज आक्षेपार्ह मजकूर प्रकरण
- झी 24 तासच्या बातमीनंतर सायबर सेलची कारवाई
- सायबर सेलच्या विशेष पोलीस महासंचालकांची विकिपीडियाला नोटीस
-- आधी मुख्यमंत्र्यांकडून दखल. आता सायबर सेलकडून विकिपीडियाला नोटीस
- तो मजकूर हटवण्याच्या कारवाईला वेग

18 Feb 2025, 17:01 वाजता

-'महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास SIT किंवा CIDकडे द्या'
--महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी
--'पोलिसांकडून फक्त चौकशी होते ठोस कारवाई होत नाही'
--ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप
---पुढील आठवड्यापासून बेमुदत उपोषणाचा इशारा

18 Feb 2025, 17:00 वाजता

संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर

संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाले. मला न्याय द्या, संतोष देशमुखांच्या आईची मागणी केली आहे. आरोपींना तातडीनं फाशी देण्याची मागणी संतोष देशमुखा यांच्या आईंनी केली आहे. आरोपींना शिक्षा देऊन न्याय द्या, संतोष देशमुखांच्या आईची सुप्रिया सुळेंकडे मागणी केली.

18 Feb 2025, 16:57 वाजता

देशमुख कुटुंबीयांशी सुप्रिया सुळेंचा संवाद

मस्साजोगला जाऊन खासदार सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख यांनी संपर्ण हत्येच्या घटनेची माहिती सुप्रिया सुळेंना दिली आणि न्यायाची मागणी केली. यावेळी देशमुख कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेत ही तुमची लढाई नसून ही आमची लढाई आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांसमोर आता पदर पसरून न्याय देण्याची मागणी करणार असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.....तसंच सर्वांचे सीडीआर काढा अशी मागणीही त्यांनी केलीय.

18 Feb 2025, 15:16 वाजता

संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह मजकुराबाबत तक्रार दाखल

संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह मजकुराबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर असल्याची तक्रार करण्यात आली आहे. भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून तक्रार दाखल करण्यात आले आहे.