वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत

Almonds Health Benefits : तल्लख बुद्धी, स्मरणशक्तीसोबत उर्जेसाठी दररोज बदाम खावे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण वयानुसार किती बदाम खावे आणि बदाम खाण्याची योग्य पद्धत माहिती असला पाहिजे, अन्य़था फायदा मिळण्याऐवजी तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं.     

नेहा चौधरी | Updated: Feb 21, 2025, 08:58 PM IST
वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत

Almonds Health Benefits : लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत घरातील महिला त्यांना दररोज बदाम खाण्यास देते. लहान मुलं बदाम खाण्यास नखरे करतात. पण बदाम खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. आई आणि आजी सांगतात की, बदाम खाल्ल्यामुळे बुद्धी तल्लख होतो. अभ्यास केलेला लक्षात राहतो आणि तुम्हाला ऊर्जा मिळते. पण आरोग्य तज्ज्ञानुसार बदाम खाण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण आहे. बदाम प्रमाणाबाहेर खाल्ल्यास आरोग्यास फायदा नाही तर नुकसान होतं. बदाममध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. ऑक्सलेट मूत्रपिंडात जमा होतं आणि क्रिस्टल्स तयार व्हायला लागतो. ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतो. तसंच बदाममध्ये उच्च फायबर असल्याने त्याचे सेवन अधिक केल्यास अपचन, पोटफुगी आणि पोटदुखीची समस्या होते. तसंच बदामांमध्ये कॅलरीज खूप जास्त असल्याने चरबी वाढते. जास्त बदाम खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढल्यास लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे वयानुसार बदाम किती खावेत शिवाय बदाम खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. (How many almonds should you eat per day according to your age correct way to eat soaked almonds health Benefits)

एका दिवसात किती बदाम खावेत?

बदाम खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बदाम हृदयासाठीही फायदेशीर मानला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसातून 5 ते 8 बदाम खाणे पुरेसे आहे. यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने आरोग्यास नुकसान होतं. वेबएमडीच्या मते, 50 ग्रॅम बदामामध्ये 300 कॅलरीज आणि 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. 12 ग्रॅम फॅट आणि 6 ग्रॅम प्रोटीन आढळतं. आता वयानुसार दररोज किती बदाम खावं ते पाहूयात. 

5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलं दररोज 2-4 बदाम खाऊ शकतात. 
12-17 वर्षे वयोगटातील लोक दिवसातून 5-9 बदाम खाऊ शकतात. 
18 वर्षांवरील लोक दिवसातून 7-8 बदाम खाऊ शकतात. 

याशिवाय, त्याच्या सेवनाचे प्रमाण देखील आपल्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुमची पचनक्रिया मजबूत असेल तर तुम्ही एका दिवसात सुमारे 20 बदाम खाऊ शकता. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून रिकाम्या पोटी सेवन करा.

बदाम खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Almonds)

बदामात व्हिटामीन ई, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-12 असते. यात रायबोफ्लोबिन असते. यात आयर्न, पोटॅशियम, जिंक,फॉलेट आणि व्हिटामीन बी असते. यातून शरीराला बरीच ताकद मिळत आणि पीरिएड्स क्रॅप्म्सही उद्भवत नाहीत. बदाम डायजेशन सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगले असते.  यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे बीपी, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

असं करा बदामाचं सेवन!

बदाम अनेक प्रकारे खाल्ले जातात, मात्र ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे. दुसऱ्या दिवशी, बदाम सोलून घ्या आणि नंतर ते चावून खा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यानंतर दूध देखील पिऊ शकता. बदाम बारीक करून त्याची पेस्ट बनवून दुधात मिसळून प्यायल्यानेही शरीराला ताकद मिळते. बदाम बारीक करून पावडर बनवता येते आणि दररोज एक चमचा खाऊ शकतो.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)