Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी तरतूद केली आहे. होम स्टेसाठीही आता मुद्रा लोन घेता येणार आहे. पर्यटन क्षेत्र आणि हॉस्पिटीलिट सेक्टर (हॉटेल व रेस्तराँ उद्योगाला) अधिक चालना मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं की, भारतातील इतर राज्यांसोबत मिळून 50 नवीन पर्यटनस्थळ विकसीत केले जातील.
होम स्टेला मुद्रा योजनेंतर्गंत कर्ज घेता येणार असल्याने होम स्टेसारख्या छोट्या उद्योगांना हातभार लागणार आहे. तसंच, होम स्टेच्या व्यवसायात वाढ होऊ शकतो. पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.
निर्मला सीतारमण यांनी मेडिकल टुरिजमला चालना देण्यासाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. खासगी क्षेत्रासोबत भागीदारी करुन भारतात वैद्यकीय सेवांसाठी येणाऱ्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. विदेशात उपचारांसाठी भरपूर खर्च येतो. अशावेळी विदेशातून लोक भारतात उपचार घेण्यासाठी येतात.
प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन उडान स्कीम अंतर्गंत 120 नवीन शहरे जुडणार आहेत. उडान योजनेंतर्गंत भारतातील ज्या शहरात विमानसेना नाही तिथे विमानतळ बांधण्यात येईल. उडान ही पंतप्रधान मोदींची महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी असेही म्हटले आहे की त्यांना चप्पल घालून विमानात चढताना लोकांना पहायचे आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांनी त्यांचे आठवे बजेट सादर केले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प आहे. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
Budget 2025, tourism development, new tourist destinations,Budget 2025, Union Budget 2025, Budget 2025 Live Updates, budget 2025 income tax slab, rail budget 2025, defence budget 2025, Budget 2025 highlights, Budget 2025 highlights hindi, budget 2025