६ सिंहीणींसोबत जंगलात फेरफटका मारत होती मुलगी, पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

सहा सिंहीणींसोबत फेरफटका मारणारी मुलगी 

Updated: Jan 12, 2022, 09:35 AM IST
६ सिंहीणींसोबत जंगलात फेरफटका मारत होती मुलगी, पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

मुंबई : Girl Roaming with Lioness : सिंह हा जगातील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. सिंहाला पाहताच सगळ्यांनाच भीती वाटते. यामुळेच, सिंहाला पाहताच, सर्वच पळून जातात. जर तुमच्या समोर सिंह आला तर तुम्ही काय कराल, पण काही लोक असे असतात जे सिंहांना घाबरत नाहीत. ते त्यांच्यासोबत चांगला वेळ देखील घालवतात. पण पुढे जे काही होतं ते अतिशय धक्कादायक आहे. 

सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ 

इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील, ज्यामध्ये सिंहासोबत पुरुष किंवा स्त्री दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक महिला सहा सिंहाशी असे वागते की जणू  चांगले मित्र आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी 6 सिंहीणीसोबत मस्ती करत फिरताना दिसत आहे.

मुलगी सिंहीणीसोबत फिरत आहे, हे पाहून असे वाटते की ती सिंहीणीसोबत नाही तर खेळण्यांसोबत खेळत आहे. हा व्हिडिओ जंगलातील आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला 6 सिंहीण एकत्र येत असल्याचे दिसेल. सिंहीण अगदी आरामात फिरताना दिसते. त्याचवेळी पुढच्याच फ्रेममध्ये एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळते. व्हिडिओ पहा-

सिहिणींसोबत मस्ती करताना दिसली मुलगी 

सिंहाच्या मागे एक मुलगी येताना दिसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मुलगी सिंहिणीच्या मागे येत खूप मजा करत आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावर तुम्हाला थोडीशी भीती दिसणार नाही. सिंहीणी देखील मुलीवर हल्ला करत नाहीत. त्यांचे वागणे पाहून ही सिंहीण मुलीची मैत्रिण असल्याचे दिसते.

व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की मुलीने सिंहिणीची शेपटी धरली आहे. हा व्हिडिओ safarigallery नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोशल मीडिया यूजर्सना मुलीची बेधडक स्टाइल चांगलीच पसंत पडली आहे. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी, व्हिडिओला आतापर्यंत 4600 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.