zee 24 taas

धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Sep 17, 2023, 10:01 AM IST

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Sep 16, 2023, 02:18 PM IST

श्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली 'शिवगामी', आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकं' मानधन

Ramya Krishnan: राम्या ही शिवगामीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिने केलेली बाहुबलीच्या आईची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. आता रम्याची गणना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असले तरीही राम्या ही या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.

Sep 15, 2023, 09:58 AM IST

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 14, 2023, 10:31 AM IST

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा नवरा, बायको भांडायची म्हणून केली प्रेयसीची हत्या

Naigaon Crime: नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. 

Sep 12, 2023, 11:36 AM IST

'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या

Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.

Sep 10, 2023, 07:24 AM IST